सावंतवाडी,दि.०२ जुलै
सध्या सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे कोंडुरे (तालुका सावंतवाडी)येथील प्राथमिक शाळेसमोरील एका मोठ्या झाडाची फांदी अचानक तुटून मुख्य रस्त्यावर पडली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र यामुळे रस्त्यावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे.गेल्या काही तासांपासून कोंडुरे परिसरात मुसळधार पाऊस आणि वारा सुरू आहे. याच दरम्यान प्राथमिक शाळेजवळ असलेल्या झाडाची एक मोठी फांदी रस्त्यावर कोसळली. रस्ता वळणदार असल्यामुळे वाहनधारकांना वाहन चालवताना अडथळा निर्माण झाला आहे . स्थानिक प्रशासनाने किंवा संबंधित विभागाने तात्काळ दखल घेऊन ही फांदी बाजूला करावी आणि रस्ता वाहतुकीसाठी सुरक्षित करावा, अशी मागणी वाहनचालकांकडून केली जात आहे.