सावंतवाडी दि.१६ ऑगस्ट
सावंतवाडी मर्कजी जमात बॉम्बे सावंतवाडी संचलित सेंट्रल उर्दू हायस्कूल शाळेच्या स्मार्ट डिजिटल क्लासरूमचा उद्घाटन सोहळा शनिवारी स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून उत्साहात संपन्न झाला . या कार्यक्रमाचे उद्घाटन सावंतवाडी मर्कजी जमात बॉम्बे संस्थेचे विश्वस्त श्री . सोहराब सुलेमान बेग यांच्या हस्ते करण्यात आले . त्यांनी आपले वडिल व सावंतवाडी मर्कजी जमात बॉम्बे संस्थेचे सहसचिव सुलेमान बेग यांच्या स्मरणार्थ डिजिटल क्लासरूमसाठी विशेष आर्थिक सहकार्य केले .
या कार्यक्रमाला सावंतवाडी मर्कजी जमात बॉम्बे संस्थेचे अध्यक्ष श्री . इम्तियाज खानापुरी , उपाध्यक्ष श्रीम. निलोफर बेग , उपाध्यक्ष श्री .हिशामुद्दीन चौधरी, सेंट्रल उर्दू हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री . इकबाल मुलाणी , सावंतवाडी मर्कजी जमात बॉम्बे संस्थेचे सचिव श्री . परवेज बेग , खजिनदार श्री . इस्माईल शेख , सेंट्रल उर्दू हायस्कूलच्या शालेय समितीचे सदस्य श्री . इशान खानापुरी , सावंतवाडी मर्कजी जमात बॉम्बे संस्थेचे विश्वस्त श्री . मुश्ताक बागवान , श्रीम. फरहीन खान , श्री . खलील खान ,
श्री . अब्दुल रहीम बागवान , श्री . समीर बागवान जि . प पू . प्राथमिक उर्दू शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीम. खतीब उपस्थित होते .
या कार्यक्रमाला सेंट्रल उर्दू हायस्कूल शाळेला मोठे आर्थिक सहकार्य करणारे उद्योजक श्री . कौसर खान यांचा सत्कार त्यांचा मुलगा श्री .फैज कौसर खान यांनी स्वीकारला .तसेच शाळेला आर्थिक सहकार्य करणाऱ्या श्रीम. मेहरून्निसा खान , श्रीम. रुकसाना शेख , श्रीम. नसीम करोल यांचा सत्कार करण्यात आला . तसेच शाळेला भेटवस्तू स्वरूपात मोलाचे सहकार्य करणाऱ्या बागवान समाजाचाही सत्कार करण्यात आला .तसेच जि . प . पू .प्राथमिक शाळेचे निवृत्त मुख्याध्यापक श्री .अबू बेग यांचाही सत्कार करण्यात आला . शाळेच्या विविध दुरुस्तीचे व कामाची देखरेख करणारे इंजिनियर श्री . मकसूद खान यांचाही सन्मान करण्यात आला . शाळेच्या निवृत्त शिक्षिका श्रीम. नसीम करोल यांनी शाळेला आपल्या मनोगतातून शुभेच्छा दिल्या . शाळेसाठी सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी माजी विद्यार्थी व पालक वर्गाला केले . तसेच सेंट्रल उर्दू हायस्कूलच्या माजी विद्यार्थीनी श्रीम. परविन शेख यांनीही आपल्या मनोगतात शाळेला शुभेच्छा दिल्या .
शाळेच्या सहाय्यक शिक्षिका श्रीम . फरजीन सय्यद यांनी उपस्थितांचे आभार मानले व कार्यक्रमाची सांगता झाली .