सावंतवाडी,दि.०३ जुलै
माजगाव मनविकास ग्रंथालय माजगाव यांच्या वतीने मार्च 2026 मधील माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण झालेल्या व संस्थेचे वाचक सदस्य असलेले कु वेदांत विष्णू सावंत, कु नियती तुषार सोलकर, मयुरेश हनुमंत मेस्त्री , ज्ञानेश्वरी नकुल सावंत ,यज्ञेश विष्णू साळगावकर या विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र, स्मृतिचिन्ह व ग्रंथ भेट देऊन गौरविण्यात आले
या सभेच्या अध्यक्षस्थानी ग्रंथालयाचे अध्यक्ष चंद्रकांत सावंत गुरुजी उपस्थित होते प्रस्ताविक व स्वागत संस्थेचे सदस्य मिलिंद कासार सर यांनी केले संस्थेचे मार्गदर्शक आर के सावंत सर यांनी संस्थेला देणगी दिली मा. सौ रेशमाताई सावंत व सौ शीतल सावंत यांनी उपस्थितांना वाचन संस्कृतीचे महत्त्व पटवून देताना या ग्रंथालयाकडे जास्तीत जास्त वाचकांनी सदस्य होऊन येथील ग्रंथ सेवेचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी संस्थेच्या ग्रंथपाल सौ मधु कुंभार लिपिका सौ रोशनी निब्रे सेविका सौ माया साळगावकर यांनी अथक परिश्रम घेतले आभार प्रदर्शन संस्थेच्या उपाध्यक्षा मा.श्रीमती मीराताई कासार यांनी केले