Sawantwadi : बॅडमिंटन स्पर्धेत मिलाग्रीस हायस्कूलची चमकदार कामगिरी

शेअर करा

जिल्हास्तरीय स्पर्धेत विद्यार्थिनीने पटकावला द्वितीय क्रमांक; ग्लेन डिसिल्वा आणि अनय नाटलेकर यांची विभागस्तरीय स्पर्धेसाठी निवड

सावंतवाडी,दि.१७ ऑक्टोंबर

मिलाग्रीस हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी बॅडमिंटन स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करत शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. नुकत्याच पार पडलेल्या जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धेत शाळेच्या विद्यार्थिनीने चमकदार खेळ करत द्वितीय क्रमांक पटकावला आहे. तसेच, शाळेचे विद्यार्थी ग्लेन एलेक्स डिसिल्वा आणि अनय गंगाराम नाटलेकर यांची १४ वर्षांखालील विभागस्तरीय बॅडमिंटन स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
​विद्यार्थ्यांच्या या शानदार यशाबद्दल शाळेचे मुख्याध्यापक प्रिन्सिपल रिचर्ड सालढाणा यांनी विशेष कौतुक केले आहे. तसेच, यशस्वी विद्यार्थ्यांचे आणि त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या क्रीडा शिक्षकांचे अभिनंदन करून त्यांनी पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

शेअर करा