सावंतवाडी,दि.०६ जुन
सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज, ६ जून रोजी पावसाने हजेरी लावली असून सकाळी संपलेल्या २४ तासांत जिल्ह्यात सरासरी ७.५ मिमी पावसाची नोंद झाली आहे. यामध्ये देवगड तालुक्यात सर्वाधिक पाऊस झाला आहे.\
तालुकावार पावसाची आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे: देवगड २२ मिमी, कुडाळ १५ मिमी, दोडामार्ग ०९ मिमी, सावंतवाडी ०७ मिमी, वेंगुर्ला ०३ मिमी, मालवण ०२ मिमी आणि कणकवली ०२ मिमी. वैभववाडी तालुक्यात मात्र आज पावसाची नोंद झालेली नाही.
जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळल्या आहेत.