Sawantwadi : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सावंतवाडी भेटीच्या स्मृतींना उजाळा

शेअर करा

२२ ऑक्टोबरला सावंतवाडी येथे अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन

सावंतवाडी,दि.२१ ऑक्टोंबर
सामाजिक समतेच्या संघर्षात ऐतिहासिक स्थान असलेल्या सावंतवाडी शहरामध्ये विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ऐतिहासिक भेटीच्या स्मृती जागवण्यासाठी गुरुवारी, २२ ऑक्टोबर रोजी विशेष अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ‘प्रेरणाभूमी सावंतवाडी’ येथे सकाळी १०.३० वाजता हा कार्यक्रम पार पडणार आहे.
​२२ ऑक्टोबर १९३२ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सावंतवाडीला भेट दिली होती. या भेटीमुळे तळ कोकणातील शोषित, वंचित आणि उपेक्षित घटकांमध्ये अभूतपूर्व सामाजिक जागृती निर्माण झाली होती. डॉ. बाबासाहेबांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही ‘प्रेरणाभूमी’ समाजबांधवांसाठी असीम श्रद्धा आणि ऊर्जेचे केंद्र बनली आहे.
​या ऐतिहासिक भेटीला वंदन करण्यासाठी आणि बाबासाहेबांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. याप्रसंगी परिसरातील सर्व उपासक-उपासिकांनी आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन कार्यक्रमाचे आयोजक अध्यक्ष डि. के. पडेलकर आणि सचिव मोहन जाधव यांनी केले आहे.

शेअर करा