सावंतवाडी,,दि.२४ जून
सावंतवाडी येथील मिलाग्रीस कॅथेड्रल (मदर चर्च) बुधवारू पारंपरिक ‘सांत जुवाव’ फेस्त सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
या पवित्र मिस्सा समारंभासाठी सिंधुदुर्ग धर्मप्रांताचे महाधर्मगुरू व बिशप मोस्ट रेव्ह. अग्नेलो पिन्यारो प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांच्या समवेत फादर मिलेट, फादर गाब्रियल, फादर अमृत, फादर ऑल्विन गोन्सालवीस आदी धर्मगुरूंनी सहकार्य केले.
यावेळी पेरिश कँथरिल मेंबर्स, श्री. ग्रेगरी डान्टस आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमादरम्यान सिंधुदुर्ग बँकेचे चेअरमन श्री. मनीष दळवी , बँक संचालक श्री. रवि मडगावकर व व्हिक्टर डान्टस यांचा बिशप आग्नेलो पिन्यारो यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी मनीष दळवी यांनी आपल्या भाषणातून बिशप यांचे आभार मानले व चर्चच्या सामाजिक कार्याला सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
सात जुवाव फेस्त निमित्त संपूर्ण परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते.