​सावंतवाडी : पर्यावरण रक्षण व अवैध वृक्षतोड रोखण्यासाठी ‘सावंतवाडी-दोडामार्ग टास्क फोर्स’ची स्थापना

शेअर करा

२५ गावे ‘पर्यावरणीय संवेदनशील क्षेत्र’ घोषित

​सावंतवाडी,दि.०६ ऑगस्ट
मा. उच्च न्यायालय, मुंबई यांच्या आदेशानुसार सावंतवाडी व दोडामार्ग तालुक्यातील अवैध वृक्षतोड आणि निसर्गाचा ऱ्हास रोखण्यासाठी ‘सावंतवाडी – दोडामार्ग टास्क फोर्स’ची स्थापना करण्यात आली आहे. या विशेष समितीच्या अध्यक्षपदी सावंतवाडीचे उपविभागीय महसूल अधिकारी तर सदस्य सचिवपदी सहाय्यक वनसंरक्षक (प्रादे. व कॅम्पा) यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
​दरम्यान, केंद्र सरकारच्या पर्यावरण, वन व हवामान बदल मंत्रालयाने २४ फेब्रुवारी २०२६ रोजीच्या राजपत्राद्वारे दोडामार्ग तालुक्यातील १३ आणि सावंतवाडी तालुक्यातील १२ अशा एकूण २५ गावांना ‘पर्यावरणीय संवेदनशील क्षेत्र’ (ESA) म्हणून घोषित केले आहे.
​टास्क फोर्स अंतर्गत समाविष्ट गावे
​सावंतवाडी तालुका: असनिये, पडवे माजगाव, भालावल, तांबोळी, सरमळे (नेवली सह), दाभिल, ओटवणे, कोनशी, धारपी, उडेली, केसरी व फणसवडे.
​दोडामार्ग तालुका: कुंभवडे, पणतूर्ली, तळकट, झोळंबे, कोलझर, शिरवल, उगाडे, कळणे, भिके कोनाळ, कुंभवाडे, खडपडे, भेकुर्ली व फुकेरी या गावांचा समावेश आहे.
​अवैध वृक्षतोड आढळल्यास संपर्क साधण्याचे आवाहन:
इको सेन्सिटिव्ह झोन असलेल्या परिसरात कुठेही बेकायदेशीर वृक्षतोड किंवा पर्यावरणाची हानी होत असल्याचे आढळल्यास नागरिकांनी तात्काळ संबंधित गावातील पोलीस पाटील, वनरक्षक, तलाठी अथवा जवळच्या वन विभागाच्या कार्यालयात माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
​तक्रार नोंदवण्यासाठी खालील संपर्क माध्यमांचा वापर करावा:
​ई-मेल: [email protected]
​दूरध्वनी (वन विभाग, सावंतवाडी): 02363-272005 आहे.
​उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार महसूल, वन आणि पोलीस विभागाच्या या संयुक्त टास्क फोर्सला नागरिकांनी निसर्ग रक्षण व अवैध वृक्षतोड रोखण्यासाठी पूर्ण सहकार्य करावे, असे प्रशासनाकडून कळविण्यात आले आहे.

शेअर करा