Sawantwadi : सावंतवाडीतील सेंट्रल उर्दू हायस्कूलमध्ये घुसून मुख्याध्यापकांना शिवीगाळ; सात जणांवर गुन्हा

शेअर करा

मुख्याध्यापकांच्या कामात अडथळा आणून शालेय साहित्याचे नुकसान केल्याचा आरोप; १३ ऑक्टोबर रोजी दुपारी घडली घटना

​सावंतवाडी,दि.१३ ऑक्टोंबर
सेंट्रल उर्दू हायस्कूल (सेंट्रल इंग्लिश स्कूल), सावंतवाडी येथील मुख्याध्यापक कक्षात बेकायदेशीरपणे घुसून मुख्याध्यापकांना शिवीगाळ करणे, कामात अडथळा आणणे व शासकीय/शालेय साहित्याचे नुकसान केल्याप्रकरणी सावंतवाडी पोलीस ठाण्यात सात जणांविरोधात विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना मंगळवारी, १३ ऑक्टोबर रोजी दुपारी १२.४५ वाजण्याच्या सुमारास घडली.
​मिळालेल्या माहितीनुसार, मुख्याध्यापक इक्बाल दस्तगीर मुलानी (वय ५१, रा. दीप रेसिडेन्सी, सालईवाडा, सावंतवाडी) हे आपल्या कक्षात कार्यालयीन काम करत होते. यावेळी आरोपींनी कोणत्याही पूर्वकल्पनेशिवाय मुख्याध्यापक कक्षात बेकायदेशीरपणे प्रवेश केला. “तुम्हाला निलंबित करण्यात आले आहे, आम्ही तुम्हाला येथे नोकरी करू देणार नाही,” असे म्हणत त्यांनी शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.
​त्यानंतर कक्षातील बोर्ड काढण्याचा प्रयत्न केला असता, तेथे उपस्थित असलेल्या सावंतवाडी जमात बॉम्बेच्या उपाध्यक्षा निलोफर बेग यांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र, आरोपींनी त्यांचे न ऐकता धक्काबुक्की करत बेग यांचा हात झटकून बाजूला केला आणि कक्षातील बोर्ड काढून नुकसान केले.
​या घटनेप्रकरणी मुख्याध्यापक इक्बाल मुलानी यांनी सावंतवाडी पोलिसांत तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी
रफ़ीद्दीन मुतालिक शेख (वय ६५, रा. मुंबई)
अश्फाक युसुफ शेख (वय ५४, रा. मुंबई)
इफ्तिकार शाहिद शेख (वय ४५, रा. मुंबई)
इफ्तिकार राजगुरू (वय ४०, रा. सावंतवाडी)
सलमान फारूक नाईक (वय ३५, रा. सावंतवाडी)
जरीना मुबारक खान (वय ६५, रा. सावंतवाडी)
निषाद ईर्शान बुराण (वय ३५, रा. सावंतवाडी)
​या सात जणांवर नुसार गुन्हा नोंदवला आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांनी दिली.
​घटनेची माहिती मिळताच सावंतवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम, सहाय्यक पोलीस निरीक्षक हिंगे व पथकाने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार धुरी करत असून आरोपींच्या अटकेची कारवाई सुरू आहे.

शेअर करा