मात्र रस्त्यावरच माती टाकल्याने वाहतुकीस अडथळा
सावंतवाडी,दि.०४ जुलै
सार्वजनिक बांधकाम खात्याने दुर्लक्षित असलेल्या शेरले दुकान वाडी ते कापई पूल (जुने) रस्त्याची नव्याने लाखो रुपये खर्च करून डागडुजी केली आहे. मात्र रस्त्याची साईड पट्टी करण्यासाठी ल टाकण्यात आलेली माती चक्क रस्त्यावरच टाकल्याने वाहतुकीला अडचण होत आहे. शिवाय अनेक वर्षे या रस्त्यावरून वाहतूक बंद झाल्याने ठिकठिकाणी झाडे वाढल्याने रस्ता वाहतूक करताना अडथळे निर्माण होत आहे तरी बांधकाम खात्याने हा रस्ता वाहतुकीस सुरळीत करावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते महेश उर्फ पप्पू खोबरेकर ग्रामपंचायत सदस्य बाळा शेरलेकर विक्रांत नेवगी यांनी केली आहे. . या बाबतचे वृत्त असे की ब्रिटिशकालीन शेकडो वर्षाचे जुने असलेले कापइ पूल हे उंचीला कमी असल्याने पावसाळ्यात वारंवार पुलावर पाणी येत असल्याने बांदा ते शिरोडा मार्गे होणारी वाहतूक पावसाळ्यात अनेक वेळा ठप्प होत होती त्यामुळे या पुलाची उंची वाढवावी अशी मागणी होत होती त्यानुसार या फुलाला पर्यायी पूल उभारण्यात आला. पर्यायाने वाहतूक नव्याने नवीन पुलावर सुरू झाल्याने या जुन्या फुलाकडे दुर्लक्ष झाल्याने वाहतूक बंद पडली. मात्र सार्वजनिक बांधकाम खात्याने दोन वर्षांपूर्वीच या रस्त्याची लाखो रुपये खर्च करून नव्याने डागदुजी केली मात्र ही डागडुजी करताना वाढलेली झाडे रस्त्यावर आल्याने रस्त्यावर अडथळा निर्माण झाला आहे .शिवाय रस्त्याची साईड पट्टी दुरुस्ती करताना टाकण्यात आलेली माती रस्त्यावर टाकल्याने प्रवास करणाऱ्यांना अडचण निर्माण होत आहे तरी बांधकाम खात्याने या याकडे लक्ष द्यावा अशी मागणी श्री खोबरेकर विक्रांत नेवगी बाळा शेरलेकर इत्यादींनी केली आहे.