सावंतवाडी, दि. ६ जून
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवराज्याभिषेक दिनानिमित्त संचयनी पॅलेस येथे अभिजीत सावंत यांच्या कार्यालयात शिवराज्याभिषेक दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.
यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. उपस्थितांनी शिवरायांच्या कार्याचा गौरव करत त्यांच्या विचारांवर चालण्याचा संकल्प व्यक्त केला.
या कार्यक्रमास अखिल भारतीय मराठा समाज सावंतवाडी तालुकाध्यक्ष अभिषेक सावंत, पुंडलिक दळवी, अभिजीत सावंत, प्रसाद राऊळ, संजय लाड, आनंद नाईक, नंदू विचारे, नाना वारंग तसेच दिगंबर नाईक आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमात शिवरायांच्या पराक्रम, दूरदृष्टी आणि लोककल्याणकारी राज्यकारभाराचा गौरव करण्यात आला. उपस्थितांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मृतीस अभिवादन करून त्यांच्या आदर्शांचे पालन करण्याचे आवाहन केले