​सावंतवाडी : जिल्हास्तरीय शालेय जुडो स्पर्धेत सिंधुदुर्ग सैनिक स्कूलची चमकदार कामगिरी

शेअर करा


​सावंतवाडी,दि.३१ जुलै


क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने ओरोस येथील क्रीडा संकुलात आयोजित जिल्हास्तरीय जुडो स्पर्धेत सिंधुदुर्ग सैनिक स्कूल आंबोलीच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे.
​स्पर्धेत १४ वर्षे वयोगटात ३५ ते ४० किलो वजनी गटात कॅडेट हन्शल सचिन साटेलकर याने प्रथम क्रमांक मिळवून सुवर्णपदक पटकावले. त्याची विभागीय जुडो स्पर्धेसाठी निवड झाली आहे. २० ते ३० किलो वजनी गटात कॅडेट हित राकेश धसकर आणि ३५ ते ४० किलो वजनी गटात कॅडेट शेवोन शानल परेरा यांनी द्वितीय क्रमांक मिळवून रजतपदक पटकावले.
​तसेच १७ वर्षे वयोगटात ५१ ते ५५ किलो वजनी गटात कॅडेट धनुष गोविंद परब याने तृतीय क्रमांक (कांस्यपदक) आणि १९ वर्षे वयोगटात ६६ ते ७३ किलो वजनी गटात कॅडेट चिराग अनिल साळुंखे याने द्वितीय क्रमांक मिळवून रजतपदक पटकावले.
​सर्व यशस्वी खेळाडूंना क्रीडा शिक्षक दिनेश जाधव यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष सुनील राऊळ, संचालक सेक्रेटरी जॉय डॉन्टस, ऑफिस सेक्रेटरी दीपक राऊळ, प्राचार्य नितीन गावडे, क्रीडा मार्गदर्शक मनोज देसाई, शिक्षकवृंद व पालकांनी विजेत्यांचे अभिनंदन केले असून विभागीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

शेअर करा