सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात १९ पैकी १४ वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे रिक्त

शेअर करा

डॉक्टरांच्या तीव्र कमतरतेमुळे आरोग्यसेवा कंत्राटी व प्रशिक्षणार्थी डॉक्टरांच्या भरवशावर

सावंतवाडी,दि.१ जून 
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रमुख आरोग्य केंद्र असलेल्या सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकार्‍यांच्या रिक्त पदांची धक्कादायक माहिती समोर आली आहे. रुग्णालयात वैद्यकीय अधीक्षक आणि वैद्यकीय अधिकारी मिळून एकूण १९ पदे मंजूर असताना, त्यांपैकी केवळ ५ पदे भरलेली असून तब्बल १४ पदे रिक्त आहेत. त्यामुळे या भागातील सर्वसामान्य रुग्णांना आरोग्य सेवेसाठी कंत्राटी, मानधनावरील आणि प्रशिक्षणार्थी डॉक्टरांच्या भरवशावर राहावे लागत असल्याचे विदारक वास्तव उघड झाले आहे.
तशातच, गेली अनेक वर्षे या रुग्णालयाचा मुख्य कणा असलेले वैद्यकीय अधीक्षक तथा प्रसिद्ध स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. ज्ञानेश्वर ऐवळे हे ३० मे रोजी नियत वयोमानानुसार निवृत्त होत आहेत. त्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात तब्बल ३० वर्षे स्त्रीरोगतज्ज्ञ म्हणून अविरत सेवा बजावली असून, ते दरदिवशी किमान ५ ते ६ शस्त्रक्रिया करत होते. अगदी वैभववाडी, कणकवली, कुडाळ आणि दोडामार्गपासून गरोदर महिला या रुग्णालयात केवळ त्यांच्या विश्वासावर उपचारासाठी येत असत. आता त्यांच्या निवृत्तीमुळे आणखीन एक अत्यंत महत्त्वाचे पद रिक्त झाले असून, केवळ चारच कायमस्वरूपी डॉक्टरांच्या खांद्यावर रुग्णालयाचा भार राहणार आहे. त्यामुळे संपूर्ण आरोग्य यंत्रणाच कोलमडण्याची भीती निर्माण झाली आहे.
दुसरीकडे, सावंतवाडीत ‘मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल’ उभारण्याचे स्वप्न २०१९ पासून स्थानिक जनतेला दाखवले जात आहे. मोठा गाजावाजा करून या हॉस्पिटलचे दिवास्वप्न पाहिले जात असताना, प्रत्यक्षात मात्र तिथे अजून एकही वीट रचली गेलेली नाही. भव्य रुग्णालयाचे स्वप्न पाहणाऱ्या सावंतवाडीकरांना आता साध्या नियमित रुग्णसेवेपासूनही वंचित राहावे लागण्याची वेळ आली असून, उपजिल्हा रुग्णालय डॉक्टरांशिवाय बंद होण्याच्या मार्गावर आले आहे.
प्रशासनाकडून कंत्राटी आणि प्रतिनियुक्तीवर डॉक्टरांची तात्पुरती सोय करून रुग्णालयाचा गाडा हाकण्याचा प्रयत्न सुरू आहे, परंतु हा केवळ तात्पुरता मलम ठरत आहे. रुग्णांना दर्जेदार, खात्रीशीर आणि शाश्वत उपचार मिळण्यासाठी सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात तात्काळ कायमस्वरूपी तज्ज्ञ डॉक्टरांची भरती करावी, अशी तीव्र मागणी आता संपूर्ण सिंधुदुर्गवासीयांकडून केली जात आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रमुख आरोग्य केंद्र असलेल्या सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकार्‍यांच्या रिक्त पदांची धक्कादायक माहिती समोर आली आहे. रुग्णालयात वैद्यकीय अधीक्षक आणि वैद्यकीय अधिकारी मिळून एकूण १९ पदे मंजूर असताना, त्यांपैकी केवळ ५ पदे भरलेली असून तब्बल १४ पदे रिक्त आहेत. त्यामुळे या भागातील सर्वसामान्य रुग्णांना आरोग्य सेवेसाठी कंत्राटी, मानधनावरील आणि प्रशिक्षणार्थी डॉक्टरांच्या भरवशावर राहावे लागत असल्याचे विदारक वास्तव उघड झाले आहे.
तशातच सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. ज्ञानेश्वर ऐवळे हे ३० मे रोजी नियत वयोमानानुसार निवृत्त होत आहेत. त्यामुळे आणखीन एक महत्त्वाचे पद रिक्त होत असून, केवळ चारच कायमस्वरूपी डॉक्टरांच्या खांद्यावर रुग्णालयाचा भार राहणार आहे.मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल चे स्वप्न पाहणाऱ्या सावंतवाडीकरांना नियमित रूग्णसेवेपासून वंचित रहावे लागणार आहे.
केवळ ४ कायमस्वरूपी डॉक्टर कार्यरत; २ डॉक्टर १० वर्षांपासून गायब!
रुग्णालयाच्या २९ मे २०२६ अखेरच्या अधिकृत अहवालानुसार, वर्ग-१ च्या वैद्यकीय अधीक्षक पदावर डॉ. ज्ञानेश्वर अर्जुन ऐवळे (स्त्रीरोगतज्ञ) कार्यरत आहेत (जे ३० मे रोजी निवृत्त होत आहेत). मात्र, उर्वरित मंजूर १८ पदांपैकी केवळ खालील तीनच डॉक्टर पूर्णवेळ सेवेत आहेत:
डॉ. प्रविण लक्ष्मण देसाई (बालरोगतज्ञ)
डॉ. निखील नारायण अवधुत (अस्थिव्यंगतज्ञ)
डॉ. हुमायुन मणेर (दंतशल्य)
धक्कादायक बाब: रुग्णालयातील डॉ. ए. यु. सय्यद आणि डॉ. जी. ए. सय्यद हे दोन अधिकारी १ ऑक्टोबर २०१५ पासून म्हणजे गेल्या दहा वर्षांहून अधिक काळ रुग्णालयातून गैरहजर (absent) आहेत.
महत्त्वाचे म्हणजे रुग्णालयातील मुख्य शल्यचिकित्सक (सर्जन), स्त्रीरोगतज्ञ, बधिरीकरण शास्त्रज्ञ (भूलतज्ज्ञ), भिषक (फिजिशियन) आणि नेत्रशल्यचिकित्सक यांसारखी अत्यंत महत्त्वाची कायमस्वरूपी पदे रिक्त असल्याने रुग्णांचे मोठे हाल होत आहेत.
कंत्राटी आणि प्रतिनियुक्तीचा तात्पुरता ‘मलम’
रुग्णालयाचा गाडा पूर्णपणे कोलमडू नये म्हणून प्रशासनाने कंत्राटी आणि प्रतिनियुक्तीवर डॉक्टरांची तात्पुरती सोय केली आहे.
१. पी.जी. बंधपत्रित (Bonded) डॉक्टर:
डॉ. सुरेश पाडुरंग सावंत (रक्तसंक्रमण अधिकारी)
डॉ. अंजना पी.

२. ११ महिन्यांच्या कंत्राटी तत्त्वावरील MBBS डॉक्टर: एकूण ९ एमबीबीएस डॉक्टर सेवा देत आहेत:
डॉ. धिरज सावंत, डॉ. भक्ती कुंभार (स्त्रीरोगतज्ञ), डॉ. अनिकेत गुरव, डॉ. ओमकार कोल्हे, डॉ. मानसी बनसोडे, डॉ. वैभव बदरवाड, डॉ. पडावटटीअडाथिल एफ.एफ, डॉ. दिनेश संगेवार आणि डॉ. मयुर सुळेभावकर.
३. ऑन कॉल आणि प्रतिनियुक्तीवरील डॉक्टरांची व्यवस्था:
ऑन कॉल भूलतज्ज्ञ: डॉ. श्रीम क्षमा देशपांडे, डॉ. आत्माराम सूर्यवंशी
ऑन कॉल फिजिशियन: डॉ. अभिजित चितारी
डायलेसिस: डॉ. शंतनु तेंडुलकर
आठवड्यातून ३ दिवस सेवा: डॉ. जि. व्ही. चौगुले आणि डॉ. संदीप जनार्दन सावंत
पुढील आदेशापर्यंत पूर्णवेळ सेवा: डॉ. विनोद तुकाराम कानगुले (भूलतज्ज्ञ) आणि डॉ. व्ही. एन. रेड्डी (फिजिशियन)
आठवड्यातून २ दिवस (मंगळवार व शुक्रवार): डॉ. बी. एस. जोशी (नेत्रशल्यचिकित्सक)
प्रशिक्षणार्थी डॉक्टरांमुळे तात्पुरता दिलासा; कायमस्वरूपी भरतीची मागणी
सध्याच्या घडीला १ मे ते ३१ जुलै २०२६ या तीन महिन्यांच्या कालावधीसाठी ६ पी.जी. प्रशिक्षणार्थी डॉक्टर (General Medicine, General Surgery, Pathology, Orthopedics, Radio Diagnosis आणि Pediatrics) रुग्णालयात तैनात असल्याने आरोग्य यंत्रणेला काहीसा दिलासा मिळाला आहे.मल्टिस्पेलिटी रुग्णसेवेचे स्वप्न २०१९ पासून पाहिले जात आहे.मोठा गाजावाजा करून ह्या हॉस्पिटल चे दिवास्वप्न पाहत असताना एकही वीट रचली जात नसताना उपजिल्हा रुग्णालय डॉक्टरांशीवाय बंद होण्याच्या मार्गावर आले आहे.तर दुसरीकडे मात्र, हा प्रतिनियुक्ती आणि कंत्राटी डॉक्टरांचा तात्पुरता मलम ठरत आहे.स्रीरोगतज्ञ डॉ ज्ञानेश्वर ऐवळे हे दरदिवशी किमान पाच ते सहा शस्त्रक्रिया करत होते अगदी वैभववाडी कणकवली, दोडामार्ग पासून गरोदर महिला या रूग्णालयात उपचारासाठी येत असत.त्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात तब्बल तीस वर्षे स्त्रीरोगतज्ज्ञ म्हणून सेवा बजावली आहे.
रुग्णांना दर्जेदार, खात्रीशीर आणि शाश्वत उपचार मिळण्यासाठी सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात तात्काळ कायमस्वरूपी तज्ज्ञ डॉक्टरांची भरती करावी, अशी तीव्र मागणी आता संपूर्ण सावंतवाडीसह सिंधुदुर्गवासीयांकडून केली जात आहे.

शेअर करा