सावंतवाडी : प्रतिपंढरपूरात आषाढी निमित्त विविध कार्यक्रम

शेअर करा

सावंतवाडी,दि.२३ जुलै

श्री देव विठ्ठल रखुमाई मंदिर सावंतवाडीत आषाढी महाएकादशी निमित्त विविध कार्यक्रम संपन्न होणार आहेत. याचा लाभ घ्यावा असे आवाहन मंदिर समितीकडून करण्यात आला आहे.

शनिवार २५ जुलै २०२६ रोजी सकाळी ६ वा. काकड आरती व महापूजा होणार असून पूजेचे मानकरी शेखर गुरुनाथ धारगळकर व नगरसेविका सौ. शर्वरी शेखर धारगळकर असणार आहेत. त्यांच्या हस्ते महापूजा होणार आहे. सकाळी ११.३० ते २.०० श्री सद्गुरु संगीत विद्यालय यांचा गायनाचा सुश्राव्य भक्ती संगीताचा कार्यक्रम तर दुपारी २ ते ३ श्री कालिका देवी भजनी मंडळ कारिवडे यांचा भजनाचा कार्यक्रम होणार आहे.दुपारी ३ ते ४ महिला मंडळ सावंतवाडी यांचा भजनाचा कार्यक्रम होणार असून सायंकाळी ४ ते ६ पंडित योगेश बोरचाटे माणगाव यांचा सुश्राव्य संगीत गायनाचा कार्यक्रम होणार आहे. सायंकाळी ६ ते ८ कीर्तनकार कीर्तनभूषण ह. भ. प. विलासबुवा गरवारे कुरोली सिद्धेश्वर, सातारा यांचे कीर्तन होणार असून रात्री ९ नंतर श्रींचा पालखी सोहळा होणार आहे.

रविवार सायंकाळी ६ ते ८ कीर्तनकार कीर्तनभूषण ह. भ. प. विलासबुवा गरवारे (कुरोली सिद्धेश्वर, सातारा) यांचे कीर्तन, ९ नंतर श्रींची पालखी सेवा., सोमवार सायंकाळी ६ ते ८ कीर्तनकार कीर्तनभूषण ह. भ. प. विलासबुवा गरवारे (कुरोली सिद्धेश्वर, सातारा) यांचे कीर्तन, मंगळवारी सायंकाळी ६ ते ८ : कीर्तनकार कीर्तनभूषण ह. भ. प. सौ. सिद्धी मेस्त्री (ओटवणे) यांचे कीर्तन, बुधवारी सायंकाळी ६ ते ८ : कीर्तनकार कीर्तनभूषण ह. भ. प. श्री हृदयनाथ गावडे (साळगाव) यांचे काला कीर्तन होणार आहे. भाविकांनी वरील सर्व कार्यक्रमांचा लाभ घ्यावा असे मंदिर समितीतर्फे आवाहन करण्यात आले आहे.

शेअर करा