सावंतवाडी तालुकास्तरीय स्पर्धेत आरोसच्या सहा विद्यार्थ्यांची धावणे व चालण्याच्या स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी!
सावंतवाडी,दि.१३ ऑक्टोंबर
बांदा हायस्कुलच्या मैदानावर पार पडलेल्या सावंतवाडी तालुका स्तरीय मैदानी क्रीडा स्पर्धेत विद्या विहार इंग्लिश स्कुल आरोसच्या विद्यार्थांनी यश संपादन केले.
यात,सानिका मनोहर शेळके हिने ३०००मीटर धावणे प्रथम, पूर्वा रघुनाथ परब ३ किमी चालणे द्वितीय , आदितेज तुकाराम मोरजकर ३ किमी चालणे द्वितीय, साक्षी रामचंद्र माणगावकर १५०० मीटर धावणे द्वितीय, वर्षा सुनिल नाईक ३ किमी चालणे तृतीय ,सोनू श्रीकांत कोकरे ३००० मीटर धावणे तृतीय यांनी यश प्राप्त केले..
यशस्वी विद्यार्थ्यांना शिक्षक निलेश देऊलकर यांचे मार्गदर्शन लाभले. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे आरोस शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष निलेश परब, सर्व संस्था पदाधिकारी, मुख्याध्यापक सदाशिव धुपकर सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी,ग्रामस्थांनी अभिनंदन केले.