सावंतवाडी,दि.०६ ऑगस्ट
सावंतवाडी तालुक्यातील वेत्ये रस्तावाडी येथील राजन रामा गावडे, वय ४५ यांनी आपल्या राहत्या घरी बंद खोली मध्ये विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. आज गुरुवारी पहाटे ६ च्या सुमारास घरातून औषधाचा तीव्र वास येत असल्याने कुटुंबियांना संशय आला म्हणून त्यांनी दरवाजा वाजवला असता आतून कोणताच प्रतिसाद मिळाला नाही. म्हणून दरवाजा तोडून आत पाहिले असता राजन हे मृतावस्थेत आढळले.
या घटने बाबत संदीप गावडे यांनी पोलिस ठाण्यात माहिती दिली. सदर घटनेची माहिती मिळताच सावंतवाडी पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी दाखल होत पंचनामा केला. राजन यांच्या आत्महत्ये मागचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. तरी मानसिक तणावातून त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले असावे असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.
*शत्यांच्या पश्चात आई, मुलगा, भाऊ, भावजय आणि पुतणे असा परिवार आहे. राजन यांच्या अचानक जाण्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.