सावंतवाडीत तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या; कारिवडे येथील घटना

शेअर करा

सावंतवाडी,दि.२१ जुलै
गोव्यातील एका खासगी कंपनीत नोकरी करणाऱ्या कारिवडे-कुंभारवाडी येथील प्रवीण चंद्रकांत खडपकर (वय २३) या तरुणाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
​मिळालेल्या माहितीनुसार, प्रवीण हा दररोज घरूनच गोव्यातील कामावर ये-जा करत असे. मंगळवारी सकाळी ८:३० वाजता त्याचे आई-वडील आपापल्या कामावर गेले होते. दुपारी २ वाजताच्या शिफ्टसाठी प्रवीण कामावर निघणार होता. दरम्यान, दुपारी १ वाजता त्याची आई घरी परतली असता, प्रवीणने घरातील बेडरूममधील लोखंडी वाश्याला नायलॉनच्या दोरीने गळफास घेतलेला आढळून आला.
​कुटुंबियांनी त्याला तातडीने उपचारासाठी हलवले, मात्र डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले.
​घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण, महिला पोलीस उपनिरीक्षक मुळीक, पोलीस हवालदार शिंदे आणि सुरेश पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. या प्रकरणी पोलीस हवालदार दीपक शिंदे हे पुढील अधिक तपास करत आहेत.

शेअर करा