नेमळे येथे श्री देवी सातेरी पंचायतन पुनःप्रतिष्ठापना वर्धापन दिन सोहळा उत्साहात

शेअर करा

23 ते 24 मे दरम्यान मंदिरात चंडियाग सोहळ्याचे आयोजन; भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घ्यावा, ग्रामस्थांचे आवाहन

सावंतवाडी,दि.२१ मे

नेमळे येथील श्री देवी सातेरी पंचायतनाचा पुनः प्रतिष्ठापनेचा वर्धापन दिन सोहळा शनिवार दि 23 मे ते रविवार दि 24 मे 2026 या कालावधीत संपन्न होत आहे या निमित्ताने श्री देवी सातेरी मंदिरामध्ये चंडियाग सोहळा संपन्न होणार आहे तरी या सोहळ्यास सर्व भाविक भक्त,देणगीदार,पाहुणे मंडळी,शिमधडे सर्वांनी उपस्थित राहून या सोहळ्याच्या कृपा प्रसादाचा महाप्रसादाचा लाभ घेण्याचे आवाहन प्रमुख गावकर मंडळी तसेच ग्रामस्थांकडून करण्यात आले आहे
कार्यक्रम पत्रिका-
शनिवार दि 23 मे –
सकाळी 7ते 11 शांती पाठ, देवतांची प्रार्थना,गणपती पूजन, आचार्य वरण, प्रकार शुद्धी देवता, स्थापना,चंडिपाठ, ग्रहयाग आरती तीर्थप्रसाद,
सायं 6 वाजल्यापासून भजनाचा कार्यक्रम.
रविवार दि 24 मे –
सकाळी 7 ते 12. 30 –
आवाहीत देवता पूजन,कुंकूमार्चन, चंदीपाठाचे हवन,बलिदान पूर्णाहुती आरती महागाऱ्हाणे,तीर्थप्रसाद,महाप्रसाद
सायं – 6 वा. पासून भजनाचा कार्यक्रम
रात्रौ- 10 वा. जय हनुमान दशावतार नाट्य मंडळाचे नाटक.

शेअर करा