जिल्हा परिषद सदस्य रुपेश पावसकर यांचा सभागृहात संताप; बीएसएनएल अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप
सिंधुदुर्ग,दि.०८ ऑगस्ट
नेरूर मतदारसंघातील बीएसएनएलची नेटवर्क सेवा पूर्णपणे बंद आहे. याबाबत जिल्हा परिषद सभागृहात जिल्हा परिषद सदस्य रुपेश पावसकर यांनी बीएसएनएल अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप केले. तनेरूर मतदारसंघाच्या परिसरातील सरंबळ, कवठी, चेंदवण, वालावल-हुमरमळा या गावांमध्ये लोकांना संपर्क करता येत नाही. मुंबईस्थित लोकांनी आपल्या गावातील नातेवाईक वृद्ध आई तिला ज्यावेळी तिचा मुलगा फोन लावत होता त्यावेळी तिला फोन लागत नाही म्हणून चलबिचल होतो. माझ्या आई कुठे? कशी आहे? काय करत असेल? अशी मुलांच्या मनात शंका निर्माण होते. या गंभीर समस्येचा प्रश्न अधिकाऱ्यांसमोर उपस्थित केला गेल्यावर अधिकारी ‘आम्हाला माहित नाही’ अशी उत्तरे देतात. जनतेच्या सुरक्षेचा आणि दळणवळणाचा प्रश्न आहे. “संबंधित बीएसएनएल अधिकाऱ्यांनी ७ दिवसात लेखी अहवाल देऊन समस्या सोडवावी अशी मागणी त्यांनी केली. अन्यथा लोकांना घेऊन रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा रूपेश पावसकर यांनी दिला.