श्री पावणाई प्रासादिक भजन व नाट्यमंडळाच्या कलाकारांनी सीमोल्लंघन सोहळ्यात सादर केले ऐतिहासिक नाट्य; प्रेक्षकांची उत्स्फूर्त दाद
सिंधुदुर्ग,दि.१६ ऑक्टोंबर
दर वर्षी घटस्थापने पासून दाभोळे गावांत श्री देव गांगेवश्वर,पावणाई,भावई मंदिरात दाभोळे वरची वाडी, मधली वाडीचे सिमोलंघना पर्यंत दहा दिवस कार्यक्रम असतात. या वर्षी श्री पावणाई प्रासादिक भजन व नाटयमंडळ दाभोळेच्या कलाकारांनी प्रेक्षकांना खीळवून ठेवत छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास उभारला.
श्री पावणाई प्रासादिक भजन व नाटयमंडळ दाभोळेच्या ग्रामीण कलाकारांनी आपली दैनदिन शेतीची कामे करत आपल्या कलाकृतींनाही जोपसले आहे. पाचव्या माळेला शिव तेज नेताजी ही कलाकृती सादर करत उपस्थित प्रेक्षकांना शीवाजी महाराजांच्या इतिहासाची आठवण करून दिली. यामध्ये दिलेरखान-सचिन घाडी, दौलत-सुनिल घाडी, मिर्झाराजे-संदिप घाडी, उदाजी-संतोष घाडी,विश्वास-संदेश घाडी, टिकोजी -अभिजीत घाडी, नवसाजी-अमित घाडी आणि शिवाजी -भिवा घाडी यांनी उत्तम वेशभूषा आणि अभिनय करत प्रेक्षकांची मने रिजवली. यामुळे आता देवगड तालुक्यातील प्रेंक्षक वर्गाचे नवव्यामाळेच्या चारित्र्याचा संघर्ष या सामाजीक नाटयाकडे लक्ष लागून राहिले आहेत.