सिंधुदुर्ग : विकास सोसायट्यांना खत पुरवठा करताना लायसन्सची अडचण

शेअर करा

अनेक विकास संस्थांमध्ये खत पुरवठा नसल्याने शेतकरी चिंतेत ; सुफला खताच्या किंमतीत 400 रुपयांनी झाली वाढ

सिंधुदुर्ग, दि. २७ मे

एकीकडे अवकाळी पावसाने अधुनमधुन सुरुवात केली आहे. त्यामुळे शेतकरी पुर्व तयारीला लागलेले आहेत. ज्या शेतक-यांच्या आंबा , काजू बागायती या डोंगराळ भागात आहेत. त्या बागायतींमध्ये पावसापूर्वी खत नेवून ठेवण्याची आवश्यकता असते. कारण , पावसाळ्यात या बागांमध्ये जाण्यासाठी पक्के रस्ते नसल्याने शेतक-यांना कसरत करावी लागते. त्यामुळे मे महिना संपत आला तरी खताचा तुटवडा निर्माण झाल्याने शेतकरी चिंतेत सापडले आहेत. तसेच सुफला खतामध्ये तब्बल 400 रुपयांनी वाढ झाली असून सुफला खताचा दर 2हजार 25 रुपये झाला आहे. तर युरीया खताचा तुटवडा कणकवली खरेदी विक्री संघात झाला आहे. विकास सोसायट्यांना खत पुरवठा करताना लायसन्सची अडचण समोर येत आहे. अनेक संस्थांना लायसन्ससाठी गावात विनामोबदला काम करणारे कृषी पदवीधर उमेदवार न मिळाल्याने ब-याच संस्थांची खत विक्री लायसन्स झालेली नाहीत. अनेक विकास संस्थांमध्ये खत पुरवठा नसल्याने शेतकरी चिंतेत सापडले आहेत. आता, एकीकडे खतांच्या वाढलेल्या किंमती तर दुसरीकडे खत पुरवठ्यामध्ये होत असलेला विलंब यामुळे दुहेरी अडचणीत शेतकरी सापडले आहेत.

शेअर करा