भाजप ग्रामीण मंडलातर्फे आगळावेगळा उपक्रम; विद्यार्थ्यांना गोसंवर्धन, पशुसंवर्धन आणि भारतीय संस्कृतीतील गायीचे महत्त्व प्रत्यक्ष अनुभवता आले.
तळेरे,दि.२४ जून
भाजपा ग्रामीण मंडल कणकवली तालुका अध्यक्ष दिलीप तळेकर यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नीतेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तळेरे नंबर १. मधील २५० विद्यार्थ्यांचे गोशाळा भेटीचे आयोजन केले होते. एक आगळा वेगळा उपक्रम राबवला. या उपक्रमातून मुलांना पशुसंवर्धन गो संवर्धन, तसेच भारतीय संस्कृतीमध्ये गायीचे महत्त्व प्रत्यक्ष अनुभवण्याची संधी मिळाली.
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी व शैक्षणिक जाणीव वाढवण्यासाठी हा केलेला उपक्रम निश्चितच प्रेरणादायी आहे. असल्या सामाजिक उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मक विचार संस्कार आणि प्रेम रुजण्यास मदत होते. राजकीय व सामाजिक क्षेत्रांमध्ये दिलीप तळेकर हे गरजू व आर्थिक दृष्ट्या दुर्बल व्यक्तींना वेळोवेळी हस्ते पर हस्ते मदत करत असतात. विद्यार्थ्यांना वेळोवेळी शैक्षणिक साहित्य पुरवणे. हे त्यांचे नित्याचे काम आहेत. या अभिनव व प्रेरणादायी उपक्रमासाठी सर्व शिक्षक वृंद व पालक वर्ग, ग्रामस्थ यांनी दिलीप तळेकर यांचे आभार मानले.