तळेरे : वामनराव महाडिक विद्यालयातील विद्यार्थिनींना सायकल भेट

शेअर करा

सामाजिक बांधिलकीचा प्रेरणादायी उपक्रम

तळेरे,दि.०१ ऑगस्ट

वामनराव महाडिक माध्यमिक विद्यालय आणि कनिष्ठ कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील पाच गरजू विद्यार्थिनींना रोटरी क्लब ऑफ मॅंगो सिटी देवगड व तळेरे गावचे प्रथम नागरिक हनुमंत तळेकर यांच्याकडून सायकल वितरण करण्यात आले. विद्यार्थिनींच्या शिक्षणाला प्रोत्साहन देणारा हा स्तुत्य उपक्रम अत्यंत उत्साहात पार पडला.
या कार्यक्रमाप्रसंगी रोटरी क्लब ऑफ मँगो सिटी देवगडच्या अध्यक्षा अनुश्री पारकर, माजी अध्यक्षा मनस्वी घारे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. यावेळी विद्यालयाचे शाळा समिती सदस्य प्रवीण वरूणकर, शरद वायंगणकर, निलेश सोरप, पालक-शिक्षक संघाचे उपाध्यक्ष राजेश भोगले तसेच विद्यालयाचे प्राचार्य अविनाश मांजरेकर आणि शिक्षक वर्ग उपस्थित होते.
या उपक्रमांतर्गत चैताली चव्हाण,कल्याणी जंगले,आर्या चव्हाण,स्वरा भोगले या विद्यार्थिनींना सायकल्स प्रदान करण्यात आल्या.
याप्रसंगी प्राचार्य अविनाश मांजरेकर यांनी रोटरी क्लब ऑफ मंगो सिटी देवगड चे मनःपूर्वक आभार मानले.विद्यार्थिनींच्या शैक्षणिक प्रगतीसाठी अशा सामाजिक उपक्रमाचे महत्त्व अधोरेखित केले.तसेच या सायकल्स उपलब्ध करून देण्यात तळेरे गावचे सरपंच व विद्यालयाचे माजी विद्यार्थी हनुमंत तळेकर यांचे मोलाचे योगदान असल्याचे नमूद करत त्यांचे विशेष आभार मानले. कार्यक्रमाचे संपूर्ण सूत्रसंचालन प्रा.सचिन शेटये यांनी केले.
सामाजिक बांधिलकी जपत विद्यार्थिनींच्या शिक्षणासाठी मदतीचा हात पुढे करणारे हनुमंतजी तळेकर व रोटरी क्लब ऑफ मंगो सिटी देवगडच्या या उपक्रमाचे उपस्थित्यांनी कौतुक केले.हा उपक्रम विद्यार्थिनींसाठी विशेष प्रेरणादायी ठरला

शेअर करा