तळेरे : जि. प. प्राथमिक शाळा आणि पंचक्रोशी माध्यमिक विद्यामंदिर, गवाणे येथे मोफत शैक्षणिक साहित्य वाटप

शेअर करा

तळेरे,दि. १९ ऑगस्ट

जि. प. प्राथमिक शाळा आणि पंचक्रोशी माध्यमिक विद्यामंदिर, गवाणे येथे मोफत शैक्षणिक साहित्य वाटप दोन्ही प्रशालेत प्राथमिक प्रशालेचे माजी विद्यार्थी, शिक्षणप्रेमी जयवंत मालणकर यांच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती सराव सेट्स, कंपास बॉक्स, वह्या, पेन्सिल अशा शैक्षणिक साहित्य वाटपाचा कार्यक्रम आनंदी वातावरणात संपन्न झाला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा समिती अध्यक्ष संतोष राणे उपस्थित होते. पंचक्रोशी माध्यमिक विद्यामंदिराच्या वतीने मुख्याध्यापक आनंद रुणकर तसेच प्राथमिक शाळेच्या वतीने प्रमुख्याध्यापक संतोष राणे यांनी पुष्पगुच्छ देऊन आभार मानले. यावेळी श्री. बारटक्के, सद्गुरू तळेकर, शिक्षकेतर कर्मचारी, विजय वाडेकर, मनोहर गोरुले, दिलीप वाडेकर आदी उपस्थित होते. येथील प्रत्येक विद्यार्थ्यांनी गावातच व्यवसायाच्या संधीचं सोनं करावं तसेच “शिका, वाचा, कमवा आणि देशाची सेवा करा” हा संदेश त्यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना दिला.

शेअर करा