तळेरे,दि.०१ ऑगस्ट
महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ आयोजित ज्ञानवर्धन स्पर्धेत कासार्डे माध्यमिक विद्यालय, कासार्डे या शाळेच्या (इ.१०वी) हिने कु.ज्योत्स्ना गोविंद कोकरे हिने ग्रामीण विभागातून कणकवली तालुकास्तरावर तृतीय क्रमांक पटकावला आहे. जिल्हाधिकारी कार्यालय,सिंधुदुर्ग येथे नुकत्याच झालेल्या समारंभात मान्यवरांच्या हस्ते तीला रोख पारितोषिक,सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
या यशस्वी विद्यार्थ्यिंनीला मराठी विभागप्रमुख श्रीम.संजिवनी नागावकर,यशवंत परब यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले.
कु. ज्योत्स्ना कोकरे हिच्या उल्लेखनीय यशाबद्दल कासार्डे विकास मंडळ मुंबईचे सर्व पदाधिकारी,प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ.बी.बी.बिसुरे, पर्यवेक्षक एस.व्ही राणे, तसेच सर्व शिक्षकवृंद-शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी तसेच पालकांनी तिचे अभिनंदन केले असून पुढील वाटचालीसाठी या शुभेच्छा दिल्या आहेत.
कु. ज्योत्स्ना कोकरे हिच्या या यशामुळे शाळेच्या शैक्षणिक गुणवत्तेत आणखी भर पडली असून इतर विद्यार्थ्यांनाही अशा ज्ञानवर्धन स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी प्रेरणा मिळाली आहे. तिच्या उज्ज्वल भविष्यासाठी सर्व स्तरांतून हार्दिक शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.