तळेरे,दि.०१ ऑगस्ट
सामाजिक कार्यकर्ते संदीप राणे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना एकूण ३६ छत्रीचे वाटप करण्यात आले.
यापूर्वीही संदीप राणे यांनी शाळेसाठी कलर प्रिंटर भेट दिली होती. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी नेहमीच झटत राहून माझा गाव आणि गावचा विकास हाच एक ध्यास घेऊन सामाजिक कार्य करणारे सामाजिक कार्यकर्ते म्हणजे संदीप राणे. सध्या पावसाळा ऋतू आणि या ऋतूत अत्यावश्यक गरज म्हणजे छत्री आणि ही विद्यार्थ्यांची अत्यावश्यक गरज पूर्ण केली.
ग्रामपंचायत सरपंच प्रभाकर ताम्हणकर, ग्रामपंचायत सदस्य हर्षदा ताम्हणकर, व्यवस्थापन समिती अध्यक्ष समीर ताम्हणकर, ग्रामपंचायत डाटा ऑपरेटर तथा व्यवस्थापन समिती सदस्य प्रशांत बारस्कर यांच्या प्रमुख उपस्थितीत छत्री वाटप करण्यात आले.
यावेळी शाळेचे मुख्याध्यापक संजना ठाकूर, पदवीधर शिक्षक सिताराम पारधिये, वळवी मॅडम, तळेकर मॅडम, अंगणवाडी सेविका दिपाली गुरव,मदतनीस अंकिता गुरव स्वयंपाकी कांजीर आदी उपस्थित होत्या. संदीप राणे यांच्या दातृत्वाचे सर्वत्र कौतुक होत आहे.