- सहा खासदारांनी पक्षाच्या निर्देशांकडे पाठ फिरवली; स्वतंत्र गटाला मान्यता मिळाल्यानंतर ठाकरे गटासमोर नवे राजकीय आव्हान
- *नवी दिल्ली,दि.१८ जून*
दिल्लीतून या घडीची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. ठाकरे सेनेत उभी फूट पडल्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. बंडखोर सहा खासदारांनी व्हीप उडवून लावला आहे. कालपासून ज्या खासदारांनी बंडाचे निशाण फडकावले आहे. ते उद्धव सेनेच्या खासदारांच्या बैठकीला अद्यापही पोहचलेले नाही. गेली दहा मिनिटे उलटूनही या बैठकीला त्यातील एकानेही हजेरी लावलेली नाही. त्यांनी पक्षाचा व्हीपच उडवून लावला आहे. त्यामुळे आता या खासदारांविरोधात कायदेशीर कारवाईचा मार्ग मोकळा झाला आहे.
