दोडामार्ग वरची धाटवाडी येथे वीज वाहिनी तुटून पडल्याने तीन म्हशी ठार लाखो रुपये नुकसान

शेअर करा

दोडामार्ग, दि. २ ऑगस्ट

दोडामार्ग तालुका महावितरण विभाग यांच्या बेजबाबदार कारभारामुळे अनेक समस्यांना नागरिक ग्राहकांना तोंड द्यावे लागत आहे. यावर कुणाचा अंकुश नाही यामुळे मनमानी कारभार सुरू आहे. दोडामार्ग वरची धाटवाडी शिवकृपा नगर येथे वीज वाहिन्या खराब आहेत. जीर्ण झाल्या आहेत. यातील एक वीज वाहिनी तुटून पडल्याने कसर्ई दोडामार्ग येथील शेतकरी शिवराम वसंत साळकर यांच्या तीन मोठया म्हशी तुटून पडलेल्या वीज वाहिनी शाॅक लागून जागीच ठार झाल्याने लाखो रुपये नुकसान झाले सुदैवाने मनुष्य हानी टळली वीज महावितरण कारभाराबाबत संताप व्यक्त केला जात आहे. माहिती देऊन देखील वीज महावितरण अधिकारी व कर्मचारी वेळत पोहोचले नाही.
दोडामार्ग ते आयी मार्गावर रस्ता शिवकृपा नगर नजीक धाटवाडी येथे वीज वाहिनी तुटून पडली. वीज प्रवाह सुरू होता याच दरम्यान साळकर यांची पाळीव जनावरे चरायला सोडली होती त्याना या वीज वाहिनीचा धक्का लागून तीन म्हशी जागीच ठार झाल्या.. दरम्यान या ठिकाणी नागरिक कुणी गेले नाही यामुळे मनुष्य हानी टळली. तीन म्हशी जागीच मृत्यू झाल्याने साळकर यांचे लाखो रुपये नुकसान झाले आहे. याबाबत दोडामार्ग पोलीस ठाण्यात देखील माहिती दिली आहे.
घटनेची माहिती वीज महावितरण विभाग यांना कळवून देखील घटना स्थळी वेळीच दाखल झाले नव्हते. वीज महावितरण विभाग यांच्या बेजबाबदार कारभारामुळे पाळीव जनावरे याना प्राण गमवावे लागले.
दोडामार्ग तालुक्यातील अनेक गावात आजही धोकादायक जीर्ण वीज खांब वाहिनी आहेत वेळेत बदलले जात नाही यामुळे अशा घटना घडत आहेत.

ki

शेअर करा