तहसीलदारांसह प्रशासन घटनास्थळी; जेसीबीच्या साहाय्याने दरड हटविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू
वैभववाडी,दि.०३ जुलै
करूळ घाटात कोसळलेली दरड बाजूला करून घाटातून एकेरी वाहतूक सुरु करण्यात आली आहे. दरम्यान दरड कोसळल्याची माहिती मिळताच तहसीलदार सूर्यकांत पाटील वैभववाडी सभापती सिद्धेश रावराणे, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे पवन पाटील घटनास्थळी दाखल झाले असून संपूर्ण दरड काढण्याचे काम जेसीबीच्या साह्याने सुरू करण्यात आले आहे