वेंगुर्ला,दि.१४ जून (प्रथमेश गुरव )
अखिल भारतीय विद्यार्थी परिषद सिंधुदुर्ग जिल्ह्याच्यावतीने १३ जून रोजी वेंगुर्ला येथे गुणवंत विद्यार्थी सन्मान सोहळा कार्यक्रम घेण्यात आला. यात वेंगुर्ला तालुक्यातील विविध शाळा व महाविद्यालयांतील दहावी व बारावी परिक्षेत यश संपादन केलेल्या गुणवंतांचा सन्मान करण्यात आला.
प्रमुख वक्ते डॉ.वसुधा मोरे यांनी कोकणातील रोजगार तसेच अल्प गुण मिळाल्याने उद्भवणाऱ्या अडचणींमधून विद्यार्थ्यांनी कसे करिअर निवडावे याबाबत मार्गदर्शन केले. याप्रसंगी बॅ.खर्डेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.डी.बी.गोस्वामी, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे जिल्हा संयोजक विनित परब व कार्यक्रम प्रमुख अथर्व परब आदी उपस्थित होते.
फोटोओळी – अखिल भारतीय विद्यार्थी परिषद सिंधुदुर्गतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला.