वेंगुर्ला : संगीत परिक्षेत चिंतामणी संगीत विद्यालयाचे उज्वल यश

शेअर करा


वेंगुर्ला,दि.१४ जून (प्रथमेश गुरव )

अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळ मुंबई अंतर्गत एप्रिल-मे २०२६ सत्रात घेण्यात आलेल्या संगीत पखवाज विशारद परिक्षेत श्री चिंतामणी प्रतिष्ठान संचलित श्री चिंतामणी संगीत विद्यालयाच्या सुजल भिकाजी गावडे आणि भाविका लक्ष्मण खानोलकर यांनी विशारद पूर्ण परिक्षेत यश संपादन करताना प्रथम श्रेणी प्राप्त केली आहे.
या विद्यार्थ्यांना विद्यालयाचे संचालक निलेश पेडणेकर व मनिष तांबोस्कर यांचे मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रविण कांदळकर यांच्यासह विद्यामान संचालकांनी अभिनंदन केले आहे.
फोटो – सुजल गावडे, भाविका खानोलकर

शेअर करा