वेंगुर्ला,दि. १६ ऑगस्ट (प्रथमेश गुरव)*
विशाल परब मित्रमंडळ आणि वेताळ प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्यदिनानिमित्ताने वेंगुर्ला हायस्कूल येथे १४ ऑगस्ट रोजी आयोजित केलेल्या समुहगीत गायन स्पर्धेत प्राथमिक गटात वेंगुर्ला नं.३ तर माध्यमिक गटात आसोली हायस्कूलने प्रथम क्रमांक पटकाविला.
स्पर्धेचे उद्घाटन बॅ.खर्डेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.धनराज गोस्वामी यांच्या हस्ते झाले. यावेळी भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना देसाई, उपनगराध्यक्ष सुहास गवंडळकर, वेंगुर्ला हायस्कूलचे मुख्याध्यापक सचिन बिडकर, साईप्रसाद नाईक, नगरसेवक अॅड.सुषमा प्रभूखानोलकर, आकांक्षा परब, काजल कुबल, रिया केरकर, प्रणव वायंगणकर, सचिन शेटये, प्रितम सावंत, भाजपाच्या वंृदा गवंडळकर, दादा केळुसकर व प्रा.सुदाम माने आदी उपस्थित हाते.
स्पर्धेत इ.५वी ते ७वी या प्राथमिक गटात प्रथम-वेंगुर्ला नं.३, द्वितीय-श्री शिवाजी हायस्कूल-तुळस, तृतीय-आडेली नं.१, उत्तेजनार्थ-वेंगुर्ला हायस्कूल आणि परबवाडा नं.१ यांनी तसेच इ.८वी ते १०वी या माध्यमिक गटात प्रथम- आसोली हायस्कूल, द्वितीय-अणसूर पाल हायस्कूल, तृतीय-न्यू इंग्लिश स्कूल-उभादांडा, उत्तेजनार्थ-श्री शिवाजी हायस्कूल-तुळस आणि वेंगुर्ला हायस्कूल यांनी पटकाविला. स्पर्धेचे परीक्षण शांताराम आसोलकर आणि भास्कर मेस्त्री यांनी केले. तर पारितोषिक वितरण युवा नेते विशाल परब आणि नगराध्यक्ष दिलीप गिरप यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले. आगामी काळात या स्पर्धेचे जिल्हास्तरीय आयोजन करण्याचा मानस असून सिंधुदुर्ग जिल्ह्रातील अधिकाधिक शाळांना यात सहभागी करून घेण्याचा प्रयत्न केला जाईल, असेही विशाल परब यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.सचिन परूळकर यांनी केले. तर आभार डॉ.गोविंद धुरी यांनी मानले. स्पर्धेच्या आयोजनासाठी महेश राऊळ, विवेक तिरोडकर, सानिया वराडकर, प्रज्वल परूळकर, रोहित गडेकर, प्रा.प्रियांका प्रभू आणि धनंजय साळवी यांनी विशेष मेहनत घेतली.
फोटोओळी – विजेत्यांना विशाल परब यांच्या हस्ते गौरविण्यात आले.