कुडाळ पोलीस ठाण्याच्या निरीक्षक पदी विकास बडवे

शेअर करा

कुडाळ,दि.०५ ऑगस्ट

कुडाळ पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकपदी विकास बडवे यांची नियुक्ती झाली असून त्यांनी आज बुधवारी पदभार स्वीकारला. पोलीस ठाण्याच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले.
कुडाळ पोलीस ठाण्याचे तत्कालीन निरीक्षक राजेंद्र मगदूम यांची बदली झाल्यानंतर हे पद रिक्त होते. त्यानंतर प्रभारींच्या हाती कारभार होता. चार दिवसांपूर्वी जिल्हा पोलीस अधीक्षकांनी केलेल्या अंतर्गत बदल्यानंतर बडवे यांची कुडाळसाठी नेमणूक करण्यात आली. याचबरोबर कुडाळ उपविभागीय पोलीस अधिकारीपदी राजेश भागवत यांचीही नियुक्ती झाली आहे. पदभार स्वीकारल्यानंतर बडवे व भागवत यांची अनेक मान्यवरांनी भेट घेऊन त्यांचे स्वागत केले.

शेअर करा