वेंगुर्ले: राजर्षी शाहू महाराज मानधन सन्मान योजनेसाठी अर्जाची मुदत १५ ऑगस्टपर्यंत वाढली

शेअर करा

ज्येष्ठ साहित्यिक व कलावंतांना दिलासा; अपूर्ण कागदपत्रांसह अर्ज पूर्ण करण्याची मिळाली अतिरिक्त संधी

वेंगुर्ले ,दि.०१ ऑगस्ट

राजर्षी शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक व कलावंत मानधन सन्मान योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत 31 जुलै एवढी होती. परंतु, आता त्याला मुदतवाढ मिळाली असून ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 15 ऑगस्ट करण्यात आली आहे. या मुदतवाढीमुळे मागील काही दिवसांत ज्यांची कागदपत्रे अपूर्ण होती, अशा कलावंत आणि ज्येष्ठ साहित्यिकांना अर्ज भरण्यास मिळणार आहे.
महाराष्ट्र शासनाच्या “राजर्षी शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक व कलावंत मानधन सन्मान योजना’ अंतर्गत सन 2026-27 साठी पात्र ज्येष्ठ साहित्यिक व प्रयोगात्मक कला क्षेत्रातील कलाकारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले होते. याची मुदत 31 जुलैपर्यंत ठेवण्यात आली होती. या काळात कागदपत्रे पूर्ण करून ऑनलाईन अर्ज करण्यासाठी कलावंतांची धावपळ सुरू होती. अखेरपर्यंत ब-याच कलावंतांनी ऑनलाईन अर्ज सादर केले. दरम्यान, या योजनेसाठी मुदतवाढ देण्यात आली असून 15 ऑगस्टपर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करण्यात येणार आहे. मागील काळात ज्यांची कागदपत्रे अपूर्ण होती तसेच ज्यांना अर्ज करायचा होता, पण अपरिहार्य कारणामुळे राहून गेला होता अशांना आता अर्ज करता येणार आहे.

शेअर करा