नागरिकांनी रोजच्या वापरातील प्लास्टिकचा भस्मासुर टाळावा – सभापती हर्षदा वाळके

शेअर करा

नांदगाव येथे पर्यावरण दिनाच्या निमित्ताने राबण्यात आली स्वच्छता मोहिम

कणकवली :
पर्यावरण रक्षणाची जबाबदारी ख-या अर्थाने प्रत्येकाची आहे. आपण रोजच्या जीवनात वावरत असताना आपल्याकडून नकळत होणा-या चुका टाळल्या पाहिजेत. प्लास्टिक कच-याची भरमसाठ वाढ होताना आहे. नागरिकांनी रोजच्या वापरातील प्लास्टिकचा भस्मासुर टाळावा असे आवाहन सभापती हर्षदा वाळके यांनी केले.
नांदगाव ग्रामपंचायत व सदगुरू निरंकारी महाराज संप्रदायाचे सहकारी यांच्या वतीने नांदगाव तिठा येथे स्वच्छता अभियान पर्यावरण दिनाच्या निमित्ताने राबविण्यात आले. यावेळी नांदगाव सरपंच भाई मोरजकर, उपसरपंच इरफान साटविलकर, ग्रामपंचायत अधिकारी आर. डी. सावंत ग्रामपंचायत सदस्य संतोष बिडये, विठोबा कांदळकर, अक्षता खोत, रिक्षा संघटना अध्यक्ष किशोर मोरये, विजय महाडेश्वर, प्रफुल्ल तोरसकर, अंगणवाडी सेविका, आशा सेविका तसेच नागरिक व सद्‌गुरू निरंकारी महाराज संप्रदायाचे सहकारी उपस्थित होते. यावेळी नांदगाव तिठा परिसरात कचरा गोळा करत स्वच्छचा मोहिम राबवून जनजागृती करण्यात आली.

यावेळी नांदगाव सरपंच भाई मोरजकर म्हणाले, नागरिकांनी स्वत:हून जर कचरा करणार नाही , ही भूमिका घेतली पाहिजे. प्लास्टिकच्या कच-यामुळे सर्वत्र घाणीचे साम्राज्य निर्माण होत आहे. गेल्या तीन महिन्यात तीनवेळा स्वच्छता अभियान राबविण्यात आली. परंतु नागरिकांना आपापल्या परिने योगदान दिल्यास अश्याप्रकारची अभियान राबविण्याची गरजच भासणार नाही. ग्रामपंचायत मार्फत ठेवलेल्या कचरा कुंडीतच कचरा टाकेन असा निश्चय नागरिकांनी करावा.

शेअर करा