कणकवली : मराठा समाजासाठी ओबीसींच्या धर्तीवर विविध शैक्षणिक व आर्थिक सवलती

शेअर करा

अखिल भारतीय मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष सुशील सावंत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मानले आभार

कणकवली :

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजासाठी ओबीसींच्या धर्तीवर विविध शैक्षणिक व आर्थिक सवलती लागू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मराठा समाजातील विद्यार्थी, युवक व सर्वसामान्य कुटुंबांना मोठा दिलासा मिळणार आहे, महाराष्ट्रातील मराठा समाजाला न्याय देणाऱ्या देणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार,पालकमंत्री नितेश राणे, खा.नारायण राणे यांचे अखिल भारतीय मराठा सेवा संघाच्यावतीने आभार मानत असल्याचे तालुकाध्यक्ष सुशील सावंत यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

मराठा समाजाला इतर मागासवर्गीय (OBC) समाजाप्रमाणे लागू करण्यात आलेल्या सवलती
महाराष्ट्र शासनाने मराठा समाजातील सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास घटकांना विविध योजनांचा लाभ मिळावा यासाठी ओबीसी समाजाच्या धर्तीवर काही सवलती लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. या सवलतींमध्ये प्रामुख्याने –
शैक्षणिक शुल्क सवलत व शिष्यवृत्ती योजना ,वसतिगृह सुविधांमध्ये प्राधान्य,कौशल्य विकास व रोजगार प्रशिक्षण योजना,स्वयंरोजगार व व्यवसायासाठी कर्ज योजनांचा लाभ,स्पर्धा परीक्षा प्रशिक्षणासाठी आर्थिक सहाय्य
विद्यार्थ्यांसाठी विविध शैक्षणिक प्रोत्साहन योजना,महिला व युवकांसाठी विशेष विकास योजना,आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी विविध कल्याणकारी योजनांचा लाभ यांचा समावेश करण्यात आला आहे.

या निर्णयामुळे मराठा समाजातील विद्यार्थ्यांना, युवकांना आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांना शिक्षण, रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी अधिक प्रमाणात उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.
मराठा समाजाच्या विकासासाठी शासनाने घेतलेल्या या निर्णयाचे राज्यभर स्वागत होत असून समाजबांधवांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे,
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाजाच्या हिताचे निर्णय पुढेही घेतले जातील, असा विश्वास सुशील सावंत यांनी व्यक्त केला आहे.

शेअर करा