आमदार प्रमोद जठार यांनी लुटला नारळ लढविण्याचा आनंद
आपली संस्कृती, परंपरा युवकांनी अशीच जोपावी – आमदार प्रमोद जठार
अलिबाग ,दि. २० ऑगस्ट
गावदेवी मंदिर, रामनाथ, अलिबाग येथे कु. अजिंक्य शेवडे मित्रमंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘नारळ फोडी स्पर्धा – भाजपा चषक २०२६’ या स्पर्धेला आमदार प्रमोद जठार यांनी भेट देत स्पर्धेचा आनंद लुटला.
पारंपरिक नारळ लढविण्याच्या या आगळ्यावेगळ्या स्पर्धेत आमदार प्रमोद जठार यांनी स्वतः नारळ लढवून सहभाग घेतला. यावेळी उपस्थित युवक व नागरिकांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला. स्थानिक संस्कृती, परंपरा आणि युवकांच्या उत्साहाला प्रोत्साहन देणाऱ्या या उपक्रमाचे आमदार जठार यांनी कौतुक केले.
स्पर्धेच्या निमित्ताने आमदार प्रमोद जठार यांचा आयोजक व कार्यकर्त्यांच्या वतीने विशेष सन्मान करण्यात आला. युवकांनी एकत्र येत आयोजित केलेल्या या उपक्रमामुळे परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.
यावेळी नगरसेवक अंकित बांगेरा, तालुका अध्यक्ष रोशन भगत, अलिबाग युवा नेतृत्व अजिंक्य शेवडे, रितेश गुरव, निखिल चव्हाण, रोहन गुरव, सुनील दामले यांच्यासह मोठ्या संख्येने युवक व नागरिक उपस्थित होते.
परंपरा, क्रीडा आणि सामाजिक एकोप्याचा संगम घडवून आणणाऱ्या या नारळ फोडी स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.