देवगड : उबाठा शिवसेनेला देवगडमध्ये मोठा धक्का!

शेअर करा

तालुका प्रमुख, पं.स. सदस्य आणि विभागप्रमुखांचा भाजपमध्ये प्रवेश

देवगड, दि. २९ मे

उबाठा शिवसेना तालुका प्रमुख जयेश नर, विद्यमान एकमेव पं.स. सदस्य विष्णू घाडी तसेच कट्टर शिवसैनिक विभागप्रमुख संदीप डोळकर यांनी उबाठा शिवसेनेला रामराम ठोकत भारतीय जनता पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. हा पक्षप्रवेश Nitesh Rane यांच्या उपस्थितीत होणार असल्याची माहिती समोर आली आहे.

खाडीपलीकडील उबाठा गटातील हे महत्त्वाचे पदाधिकारी भाजपमध्ये प्रवेश करत असल्यामुळे स्थानिक राजकारणात मोठी खळबळ उडाली असून उबाठा गटाला मोठे खिंडार पडणार असल्याची चर्चा सुरू आहे.

शेअर करा