देवगड आगाराच्या पाहणीत अधिकाऱ्यांना समस्यांचे तात्काळ निराकरण करण्याचे आदेश; स्वच्छतेबाबत नाराजी व्यक्त करत यांत्रिक झाडू संकल्पना राबविण्याची घोषणा
देवगड,दि.३१ मे
एस्टीचा 78 वा वाढदिवस असल्याने राज्यातील सर्व आगाराच्या कंपाऊंडलगत 78 हजार झाडे लावण्याचा संकल्प राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केला.परिवहन मंत्र्यांनी देवगड आगाराला भेट देवून पाहणी केली यावेळी प्रवाशी व नागरिकांतून समस्यांचा पाढाच मंत्र्यांसमोर वाचण्यात आला.समस्यांचे निराकरण केल्याचा अहवाल तात्काळ द्या अन्यथा निलंबनाची कारवाई करण्यात येईल असा सज् जड दम ना.सरनाईक यांनी विभाग नियंत्रक व अधिकाèयांना दिला.यावेळी एस्टी स्थानकाच्या स्वच्छतेबद्दल व इतर समस्यांबद्दलही त्यांनी नाराजी व्यक्त केली.एस्टी स्थानकांमधील अस्वच्छता दुरू करण्यासाठी यांत्रिक झाडू ही संकल्पना राबविणार असल्याचे सरनाईक यांनी सांगीतले.
राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी रविवारी दुपारी देवगड बसस्थानकाला भेट देवून पाहणी केली.यावेळी त्यांचासमवेत माजी आमदार राजन तेली, शिवसेना नेते संजय आग्रे, संदेश पटेल, तालुकाप्रमुख विलास साळसकर, उपसभापती अमोल तेली, विभाग नियंत्रक दीपक घोडे, पं.स.सदस्या सौ.सलोनी तळवडेकर, यंत्र अभियंता पांडूरंग वाघमोडे, आगारव्यवस्थापक सौरभ औंधकर, स्थानकप्रमुख श्रीकांत सैतवडेकर आदी अधिकारी व कर्मचारी तसेच एस्टीच्या विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.
स्वच्छतागृहाची पाहणी व नाराजी
ना.सरनाईक यांनी बसस्थानकामधील सुलभ शौचालयाची पाहणी केली.यावेळी त्यांना स्वच्छता कर्मचारी स्वच्छता करीत असल्याचे निदर्शनास येताच त्यांनी अधिकाèयांना मंत्री आले म्हणून स्वच्छेतेचे काम सुरू आहे का असे खडे बोल सुनावत एस्टी स्थानकाच्या स्वच्छतेवर भर द्या.तसेच बैठक व्यवस्था, नवीन पंखे, पिण्याचे पाणी, प्रवाशांसाठी आवश्यक सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यावर भर द्या अशा सुचना दिल्या.संपूर्ण बसस्थानकाची पाहणी करून बसस्थानकामधील बुक व पेपर स्टॉलवर जावून स्टॉलधारकांशीही संवाद साधला.त्यांचा समस्याही जाणुन घेतल्या.
एस्टी कर्मचाèयांचाही समस्या घेतल्या जाणून
यावेळी एस्टी कर्मचाèयांच्या विविध संघटनांच्या पदाधिकाèयांनी ना.सरनाईक यांच्यासमोर आपल्या समस्या मांडून निवेदन दिले.कर्मचाèयांची कमतरता व गाड्यांची अवस्था यावरही मंत्र्यांचे लक्ष वेधण्यात आले.यावेळी त्यांनी एस्टीच्या ताफ्यात आता इलेक्ट—ीक बस देण्यावर भर असून नवीन गाड्या देताना त्या इलेक्ट—ीक बसेस देण्यात येणार असल्याचे सांगीतले.कर्मचाèयांची नवीन भरतीप्रक्रिया करण्यात येणार असून सीएनजीबाबत असमधानी असल्याचेही त्यांनी सांगीतले.
बसस्थानकामधील हिरकणी कक्ष सुसज्ज करणे, कर्मचाèयांसाठी राहण्याची सोय, गरम व थंड पाण्याची सोय यावर भर देणाèया असल्याचेही त्यांनी यावेळी सांगीतले.
अन् त्या कर्मचाèयाला अखेर बदलीच्या ठिकाणी केले कार्यमुक्त
देवगड आगारातील क्लार्क पदावर असलेल्या महिला कर्मचाèयांने मुंबईत आई आजारी असल्याने बदलीचा अर्ज दिला होता त्यानुसार बदलीचे आदेश काढण्यात आले होते.मात्र त्या कर्मचाèयाला गर्दीचा हंगाम असल्याने बदलीच्या ठिकाणी सोडण्यात आले नाही यामुळे संबंधित महिला कर्मचाèयांने ना.सरनाईक यांच्यासमोर आपल्या भावना मांडल्या.यावेळी त्या कर्मचाèयाची आई आजारी असल्याने तात्काळ बदलीच्या ठिकाणी कार्यमुक्त करण्याचे आदेश सरनाईक यांनी देवून त्या आदेशावर सही करून कर्मचाèयाला बदलीच्या ठिकाणी सोडण्यात आले.