कट्टा-घाडणीचे पाणी येथे घटना; बेशुद्ध अवस्थेत देवगड ग्रामीण रुग्णालयात दाखल, उपचारापूर्वीच मृत घोषित
देवगड,दि.०२ ऑगस्ट
घरातार्बल कपाटाचे का करीत असताना बोलता बोलता अचानक जमीनीवर पडून बेशुध्द झालेल्या राजस्थान धील कामगाराला देवगड ग्रामीण रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले मात्र तपासणीअंती त्याचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाèयांनी सांगीतले.गुल्लारा हिरालाल डोगीवालो(45) सध्या रा.जामसंडे शिळोम मुळ रा.जयपुर राजस्थान असे मयत कामगाराचे नाव असून ही घटना कट्टा घाडणीचे पाणी या ठिकाणी दि. 2 ऑगस्ट रोजी दुपारी 3.50 वा.सुमारास घडली.ाबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, कट्टा घाडणीचे पाणी येथील रूद्रेश सखाराम बांदेलकर यांच्या घरात गुल्लाराम हिरालाल डोगीवालो हे मार्बलचे कपाट तयार करण्याचे काम करीत होते.बोलता बोलता अचानक खाली जमीनीवर पडून ते बेशुध्द झाले.काहीच हालचाल न झाल्याने त्यांना तात्काळ देवगड ग्रामीण रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले मात्र वैद्यकी अधिकारी यांनी तपासणी करून ते मयत झाल्याचे सांगीतले.याबाबत मोहनलाल कानाराम सुन्डा(38) रा.जयपूर राजस्थान सध्या रा.सहकारनगर यांनी देवगड पोलिस स्थानकात खबर दिली.पोलिसांनी आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद केली असून तपास स.पो.उपनिरिक्षक प्रवीण सावंत करीत आहेत.