नाडणच्या श्री महादेश्वर फुगडी मंडळासह भैरववाडीच्या श्री देव भैरव जोगेश्वरी फुगडी मंडळाचा सहभाग; महिला-पुरुष प्रेक्षकांसाठी लकी ड्रॉचेही आयोजन
देवगड,दि.२९ सप्टेंबर
देवगड पोलीस ठाण्याच्या वतीने सालाबादप्रमाणे यंदाही श्री गणेश चतुर्थीनिमित्त श्री सत्यनारायण महापूजेचे आयोजन शुक्रवार, दि. २ ऑक्टोबर २०२६ रोजी करण्यात आले आहे. या धार्मिक सोहळ्यासोबतच रात्री ९ वाजता फुगडीच्या जुगलबंदीचा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
या फुगडीच्या जुगलबंदीत नाडण, ता. देवगड येथील श्री महादेश्वर फुगडी मंडळ तसेच भैरववाडी, ता. कुडाळ येथील श्री देव भैरव जोगेश्वरी फुगडी मंडळ सहभागी होणार आहेत. पारंपरिक फुगडीच्या माध्यमातून रंगणारी ही जुगलबंदी कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरणार आहे.
महिला व पुरुष प्रेक्षकांसाठी विशेष लकी ड्रॉचे आयोजन करण्यात आले असून, विजेत्यांना आकर्षक बक्षिसे देण्यात येणार आहेत. हा कार्यक्रम जुने पोलीस ठाणे, देवगड येथे होणार आहे.
या धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमास नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आनंद घ्यावा, असे आवाहन देवगड पोलीस अधिकारी, कर्मचारी वृंद व गृहरक्षक दलाच्या वतीने करण्यात आले आहे. श्रींचे विसर्जन मंगळवार, दि. ६ ऑक्टोबर २०२६ रोजी करण्यात येणार आहे.