देवगड (प्रतिनिधी )
गेल्या काही दिवसांपासून सिंधुदुर्ग जिल्ह्यात उष्णतेचा कहर पाहायला मिळत होता. तापमानात सातत्याने वाढ होत असल्याने नागरिक उकाड्याने हैराण झाले होते. अशातच आज भल्या पहाटे विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह वळवाच्या पावसाने जोरदार हजेरी लावली. सकाळपासूनच देवगडात सर्वत्र ढगाळ वातावरण निर्माण झाले असून, या पावसामुळे वाढत्या तापमानापासून नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे.
तहसील नियंत्रण कक्षाकडून प्राप्त झालेल्या आकडेवारीनुसार, आज २४ मे रोजी सकाळी संपलेल्या २४ तासांत
तालुकानिहाय पर्जन्यमान (मिमी मध्ये):
देवगड: १०३ मिमी (सर्वाधिक)
जिल्ह्याचा सरासरी पाऊस: ३४.४६ मिमी नोंद झाली आहे.
या वळवाच्या पावसामुळे देवगड तालुक्याला चांगलाच झोडपून काढले असून, तिथे सर्वाधिक १०३ मिमी पावसाची नोंद झाली आहे, तर कणकवलीमध्येही ७० मिमी इतका जोरदार पाऊस झाला आहे.. अचानक आलेल्या या पावसामुळे व्यापारी प्रवासी वर्ग शेतकऱ्यांची मात्र काहीशी धांदल उडाली. तसेच वीज पुरवठा काही काळ खंडित झाला. समुद्रातील मासेमारी करीता गेलेले मच्छिमार सुखरूप किनाऱ्यावर पोहचले आहेत काही ठिकाणी रस्त्याची कामे सुरु असल्याने रस्ते निसरडे बनले व गाड्या घसरल्या कोणतीही हानी झालेली नाही.