देवगड : डंपरच्या धडकेत जखमी कामगाराचा हात निकामी; चालकाविरुद्ध गुन्हा दाखल

शेअर करा

देवगड–नांदगाव रस्त्याच्या काँक्रीटीकरणादरम्यान वाहतूक नियंत्रण करताना डंपरची धडक; गोव्यात उपचारादरम्यान डावा हात पूर्णपणे निकामी, दोन महिन्यांनंतर पोलिसांत गुन्हा नोंद.

देवगड,दि.१० जुलै

देवगड नांदगांव मार्गाच्या काँक्रीटीकरण कामादरम्यान डंपर मागे घेताना एका लेनचे वाहतुक व्यवस्थापन करीत असताना निलेश गणपत मुंबारकर(45) रा.मिठमुंबरी साखार्डेवाडी ता.देवगड यांना डंपरने धडक बसून झालेल्या अपघातात निलेश मुंबारकर हे रस्त्यावर पडले यावेळी डंपरचे चाक डाव्या हातावरून गेल्याने गंभीर दुखापत झाली होती.त्यांच्यावर गोवा येथे उपचार करताना त्यांचा डावा हात पुर्णत: निकामी झाला आहे.हा अपघात 27 मे रोजी रात्री 8.30 वा.सुमारास दाभोळ तिठ्ठयानजिक चावडी चायनीज हॉटेलनजिक घडला होता.या अपघाताची नोंद गुरूवारी देवगड पोलिस स्थानकात करण्यात आली असून डंपरचालक नीरज रघुराज कोल(22) मुळ रा.मध्यप्रदेश,सध्या रा.देवगड याच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, दाभोळे तिठ्यानजिक रस्त्याचे काँक्रीटीकरणाचे काम सुरू असताना देवगड ते नांदगाव अशा एका लेनचे वाहतुक व्यवस्थापन निलेश मुंबारकर हे करीत होते.यावेळी डंपरचालक नीरज कोल याने आपल्या ताब्यातील डंपर(डंपर क्रमांक एम् एच् 12, एक्स एम् 9553) चालविताना कोणतीही तजवीज न ठेवता व कोणत्याही व्यक्तिस साईड दाखविण्यासाठी तेथे उभे न करता डंपर मागे घेत होता.यावेळी त्याने हॉर्न न वाजविता व वाहतुक नियमांचे पालन न करता डंपर मागे घेवून तेथे उभे असलेल्या निलेश मुंबारकर यांना पाठीमागून धडक दिली.मुंबारकर हे रस्त्यावर पडले असता डंपरचे पाठीमागील चालकाचा विरूध्द दिशेकडील चाक मुंबारकर यांच्या डाव्या हाताच्या कोपèयावरून गेल्याने त्यांना गंभीर दुखापत झाली.त्यांना तात्काळ प्राथमिक उपचारानंतर गोवा येथे नेण्यात आले.यावेळी त्यांचा डावा हात पुर्णत: निकामी झाल्याने व संसर्गदोष होवू नये याकरीता वैद्यकीय अधिकाèयांना मुंबारकर यांचा डावा हात कोपèयातून काढून टाकावा लागला.या घटनेची फिर्याद निलेश मुंबारकर यांनी गुरूवारी देवगड पोलिस स्थानकात दिली.त्यानुसार, देवगड पोलिसांनी डंपरचालक नीरज कोल याच्याविरूध्द गुन्हा दाखल केला आहे.घटनेचा तपास स.पो.उपनिरिक्षक अनिलकुमार पवार करीत आहेत.

शेअर करा