७ नोव्हेंबरला मासिक सभा; बँकिंग व्यवहारातील आर्थिक फसवणूक व सायबर गुन्ह्यांबाबत तज्ज्ञांचे मार्गदर्शन!
सावंतवाडी,दि.०५ नोव्हेंबर
ज्येष्ठ नागरिक संघ सावंतवाडीची मासिक सभा, शनिवार दि.७ नोवेंबर रोजी सकाळी साडेदहा वाजता, ज्येष्ठ नागरिक सुविधा केंद्र, सालईवाडा, सावंतवाडी येथे आयोजित करण्यात आलेली आहे, यावेळी जेष्ठ नागरिकांची बँकिंग व्यवहारात होणारी आर्थिक फसवणूक, सायबर गुन्हे याबाबत स्टेट बँक ऑफ इंडिया, सावंतवाडीचे उपशाखा व्यवस्थापक सौ. गौतमी महाजन यांचे मार्गदर्शन लाभणार आहे, तरी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून या मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.




