दोडामार्ग शहरात होणार हक्काचे रिक्षा स्टॅन्ड

शेअर करा

दोडामार्ग ,दि. १९ ऑगस्ट
गेली अनेक वर्षे प्रलंबित असलेला दोडामार्ग शहरातील अधिकृत रिक्षा स्टॅन्डचा प्रश्न लवकरच मार्गी लागणार असल्याने रिक्षा चालक मालक संघटनेच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. गुरुवारी कोकण विभाग रिक्षाटॅक्सी महासंघ व उपप्रादेशिक परिवहन विभागाने पाहणी केली असून गणेश चतुर्थी पूर्वी अधिकृत रिक्षा स्टॅन्ड होणार.


याबाबत अधिक माहिती अशी की दोडामार्ग तालुका स्वतत्र निर्माण झाल्या नंतर अनेक विकास कामान बरोबर शहरातील रिक्षा टॅक्सी चालक मालक संघटनेच्या हक्काच्या रिक्षा स्टॅंडचा प्रश्न प्रलंबित होता. कसई दोडामार्ग नगरपंचायत चे नगरध्यक्ष चेतन चव्हाण, सार्वजनिक बांधकाम विभाग जेष्ठ नागरिक यांनी सहकार्य करून लागणाऱ्या कागदपत्रा ची पूर्तता केली आहे. हक्काचे रिक्षा स्टॅन्ड होण्यासाठी सर्व कागदपत्रे संबंधित विभागाकडे पूरविण्यात आली आहेत.


याच अनुषंगाने गुरुवारी रिक्षा चालक मालक संघटनेच्या वतीने श्रावाण मासात श्री पिंपळेश्वर देवस्थान येथे श्री सत्यनारायण पूजा आयोजित केली होती. या निमित्ताने कोकण विभाग रिक्षा टॅक्सी महासंघ पदाधिकारी उप प्रादेशिक कार्यालयाचे अधिकारी यांनी दोडामार्ग शहरात रिक्षा स्टॅन्ड ची पाहणी केली. यावेळी


कोकण विभाग रिक्शाटॅक्सी महासंघ कार्याध्यक्ष संतोष नाईक,
सह सेक्रेटरी सुधीर पारडकर,
मालवण तालुकाध्यक्ष संदीप सावंत, कणकवली मंगेश सावंत,
मानावाधिकार संघटना जिल्हा समन्व्यक सिंधुदुर्ग रत्नागिरी प्रणय बांदिवडेकर, दोडामार्ग रिकाहा संघटना संतोश हळणकर, रिक्षा संघटना पदाधिकारी नगराध्यक्ष चेतन चव्हाण,तसेच दोडामार्ग मधील विकास सेवा सोसायटी अध्यक्ष सूचना कोरगावकर, पांडुरंग बोर्डेकर, संदीप गवस, जेष्ठ नागरिक संघटना अध्यक्ष दिनकर उगवेकर, सावंत
आदी उपस्थित होते.

शेअर करा