दोडामार्ग : गोव्यातील संशयिताला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने केली अटक

शेअर करा

घरात घुसून चाकूचा धाक दाखवत दिली होती धमकी; दोडामार्ग येथील गुन्ह्यात केली अटक

दोडामार्ग,दि.१५ जुलै

एक आठवडयापूर्वी दोडामार्ग पणजी मुख्य रस्त्यावर एका इमारती मध्ये युवती युवक गैरवर्तन करताना येथील मालक रोहन चव्हाण याने जाब विचारला असता सोबत असलेल्या युवकाने रोहन चव्हाण वर सुरी हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. याबाबत दोडामार्ग पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती सीसीटीव्ही व्हिडिओ दिले होते. सदर आरोपी फरार होता अखेर
अखेर स्थानिक गुन्हा शाखा यांनी सापळा रचून मंगळवारी रात्री उशिरा ताब्यात घेतले.

     दोडामार्ग  पोलिस ठाणे गुर.नं. 130/2026, भा.न्या.सं. कलम 131,329(3),351(3),352 सह मपोका कलम 37(1)/135 प्रमाणे गुन्हा दाखल आहे.

हकिगत-फिर्यादी हे घरी असताना फिर्यादी यांचे घराचे कंपाऊड मध्ये एक अनोळखी मुलगा दारु पित होता व त्याच्या सोबत असलेली त्याची मैत्रिण ही एका कोपऱ्यात लघुशंका करत असताना दिसली म्हणुन फिर्यादी यानी त्याना सदर ठिकाणी असे कोणतेही कृत्य करु नये म्हणुन सांगितले असता त्याला त्याचा राग येवुन त्याने फिर्यादी याचेशी वाद घालण्यास सुरुवात केली व आपले गाडीतील चाकु घेवुन फिर्यादी रोहन सुभाष चव्हाण याचेवर व त्याचे सोबत असलेले शुभम मुळगांवकर याचे पाठीमागे धावत आला व दोघांना शिवीगाळी करुन मारण्याची धमकी दिली देवुन आपल्या मैत्रिणीसह स्विफट गाडी नं GA07 E 6051 मधुन निघुन गेला म्हणुन गुन्हा दाखल आहे.

सदर गुन्ह्याचे समांतर तपासात तांत्रिक विश्लेषण व गोपनीय माहितीवरुन नमूद गुन्ह्यातील आरोपी इसम नामे चेतन दयानंद कोरगावकर, वय 36 वर्षे,राह- सांताक्रूझ ओल्ड गोवा यास निष्पन्न करून त्यास आज दिनांक 14/07/2026 रोजी त्याचे राहते परिसरातून शिताफीने ताब्यात घेवून त्याचेकडे सदर गुन्ह्याचे अनुषंगाने तपास केला असता त्याने सदरचा गुन्हा केल्याचे कबूल केले आहे.

त्याची वैद्यकीय तपासणी करून पुढील कार्यवाहीकरिता दोडामार्ग पोलिस ठाण्याचे ताब्यात देण्यात आलेले आहे.
सदरची कारवाई मा.श्री.मोहन दहिकर, पोलीस अधीक्षक सिंधुदुर्ग, मा. कु. नयोमी साटम, अप्पर पोलीस अधीक्षक सिंधुदुर्ग यांच्या सुचनेनुसार पोलीस निरीक्षक श्री.प्रवीण कोल्हे यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक अनिल हाडळ , सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुरेश राठोड,
पोलिस हवालदार- जॅकसन घोन्सालविस,विल्सन डिसोझा,आशिष जामदार,पोलिस अंमलदार- अमर कांडर,महिला पोलिस शिपाई धनश्री परब (सायबर) यांच्या पथकाने केलेली आहे.

शेअर करा