दोडामार्गात वडाच्या झाडाची भलीमोठी फांदी रस्त्यावर कोसळली; वाहतूक काही काळ ठप्प

शेअर करा

वसतिगृहाजवळील ऐतिहासिक वडाच्या झाडाची फांदी अचानक तुटली; नगरपंचायतीने फांदी हटविण्याची मोहीम हाती घेतली, पर्यायी मार्गामुळे मोठा अनर्थ टळला

दोडामार्ग, दि. १९ जुलै

दोडामार्ग येथील वसतिगृह नजीक गेल्या कित्येक वर्षांपासून दिमाखने
उभ्या असलेल्या तसेच खेळाडू विद्यार्थी यांच्यासाठी सावलीचा आधार तर वट पौर्णिमा दिवस महिलांना वड पूजा करणे तसेच सात फेरे घेण्यासाठी सोयीचे ठरलेल्या वडाच्या झाडाची भलीमोठी फांदी रविवारी दुपारी मोडून चक्क रस्त्यावर पडली यामुळे दोडामार्ग ते आयी मार्ग वाहतूक मार्ग ठप्प झाला मैदान ते कसर्ई सातेरी मंदीर पर्यायी मार्ग असल्याने वाहन धारकांची गैरसोय झाली नाही. झाड पडून देखील आपत्ती व्यवस्थापन कुणी फिरकले नाही. अखेर कसर्ई दोडामार्ग नगरपंचायत कडून झाडाची फांदी बाजूला करण्यासाठी हालचाली सुरू होत्या कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले होते.

दोडामार्ग ते आयी मार्गावर अनेक ठिकाणी रस्ता कडेला धोकादायक झाडे आहेत वडाच्या झाडाची फांदी पडली अलीकडे धाटवाडी मध्ये चार झाडे धोकादायक आहेत वाकून खाली आली आहेत. पण बांधकाम विभाग कडून अद्याप ती तोडलेली नाही. दुर्घटना घडली कि बांधकाम विभाग आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा जागी होणार असा सवाल उपस्थित केला जात आहे.
दोडामार्ग वसतिगृह नजीक भले मोठे वडाचे झाड होते गेल्या वर्षी पण काही फांद्या तुटल्या होत्या काही वर अडकून होत्या. गेल्या दोन दिवसापासून पाऊस पडत आहे. रविवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास या वडाच्या झाडाची मोठी फांदी अलगद रस्त्यावर पडली फांदी पडण्यापूर्वी दिड मिनिटे अगोदर दोन लहान मुले पुढे गेली आणि फांदी पडली थोडक्यात दोघे जण वाचले.

वडाच्या झाडाची फांदी मोडून पडली त्याच बरोबर काही वीज वाहिन्या तुटून पडल्या वीज प्रवाह सुरू होता तो तातडीने बंद करायला लावला झाडाची फांदी पडल्याने दोडामार्ग ते आयी मार्ग ठप्प झाला. बाजूला असलेल्या खेळाचे मैदान ते सातेरी मंदीर असा पर्यायी मार्ग होता यामुळे शेकडो वाहन धारकांना दिलासा मिळाला अन्यथा शेकडो वाहने अडकून पडली असती. 

झाडाची फांदी मोडून वाहतूक बंद याबाबत बांधकाम आपत्ती व्यवस्थापन याना कळवून देखील कोणी फिरकले नव्हते कसर्ई दोडामार्ग नगरपंचायत कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. नगरपंचायत कडून झाडाची फांदी बाजूला करण्यासाठी प्रयत्न सुरू होते. या ठिकाणी आणखी धोकादायक झाडे आडवी आली आहेत ती तोडून अपघात टाळावे अशी मागणी केली जात आहे.
वडाच्या झाडाची फांदी पडत असताना कोणी वाहन धारक खाली न आल्याने मोठा अनर्थ टळला शेकडो वाहनांची ये जा सुरू असते.

शेअर करा