Dodamarg News : मणेरीतील महापुरुष मंदिराच्या सभागृहावर पिंपळाची भलीमोठी फांदी कोसळली!

शेअर करा

सिमेंट पत्रे व लोखंडी रॉडचे नुकसान; लाखो रुपयांचा फटका, सुदैवाने जीवितहानी टळली!

दोडामार्ग , दि. ३१ आॅक्टोबर

येथून जवळच असलेल्या मणेरी बाजारपेठ जागृत देवस्थान अशी ओळख असलेल्या श्री महापुरुष
मंदिराच्या सभागृहाच्या बाजुला असलेल्या पिंपळाच्या झाडाची भलीमोठी फांदी मोडून सभागृहावर पडल्याने मोठे नुकसान झाले आहे.
मणेरी बाजारपेठ येथील महापुरुष मंदिराच्या सभागृहावर फांदी पडल्याने वरील सिमेंट पञे तुटले तसेच लोखंडी राॅड वाकून तुटले आहेत. यावेळी कोणी सभागृहात नसल्याने मोठा अनर्थ टळला. फांदी पडून जवळपास लाखो रुपये नुकसान झाले आहे.

शेअर करा