Dodamarg News : दोडामार्ग-विजघर सिमेंट काँक्रिट रस्त्याच्या कामाला तडे!

शेअर करा

कोनाळकट्टा येथे दहा दिवसांतच पाच ठिकाणी भेगा; निकृष्ट कामाचा ग्रामस्थांचा आरोप, तडे गेलेला भाग पुन्हा करण्याचे आश्वासन!

दोडामार्ग, दि. ३१ आॅक्टोबर

राज्य सरकार कडून कोटयावधी रुपये खर्च करून दोडामार्ग ते विजघर रस्ता सिमेंट काँक्रिट केला जात आहे. हा रस्ता करताना कामात कोणत्याही प्रकारची पारदर्शकता दिसून येत नाही. सर्व काम निकृष्ट दर्जाचे केले जात आहे यामुळे हा रस्ता दोन वर्षे देखील टिकणार नाही असे चित्र दिसत आहे. कोनाळकट्टा येथे दहा दिवसापूर्वी केलेल्या रस्ता सिमेंट काँक्रिट रस्ता याला पाच ठिकाणी भेगा तडे गेले आहेत यामुळे किती निकृष्ट दर्जाचे काम केले जात आहे हे समोर आले आहे. संबंधित अधिकारी ठेकेदाराची पाठराखण करत आहेत. स्थानिक ग्रामस्थ यांनी हे निदर्शनास आणून दिले या नंतर तडे गेलेला भाग खोदून पुनश्च काम केले जाईल असे सांगितले.

शेअर करा