दोडामार्गमध्ये मजुरीसाठी आलेल्या कामगाराचा आकस्मिक मृत्यू

शेअर करा

म्हावळणकरवाडी येथील शेतमांगरात मृतावस्थेत आढळला; दोडामार्ग पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद

दोडामार्ग, दि.७ जून
दोडामार्ग म्हावळणकरवाडी येथे शेतात काम करणाऱ्या रघुनाथ दिगंबर खिलारी वय वर्षे ४३ रा.सद्या म्हावळणकरवाडी मूळ गाव
शेनवडी जि. सातारा हा शेखर विष्णू फाटक यांच्या शेत मांगरात मृत अवस्थेत आढळून आला याबाबत दोडामार्ग पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू नोंद करण्यात आली आहे अशी माहिती पोलीस निरीक्षक हेमचंद्र खोपडे यांनी दिली. शेखर विष्णू फाटक यांनी पोलीस ठाण्यात खबर दिली.

हकीगत- यातील मयत हा मजुरीचे काम करायचा व तो फिर्यादी यांचे म्हावळणकरवाडी येथील शेतमानगर मध्ये राहण्यास होता. आज सकाळी तो उशिरा पर्यंत झोपलेल्या स्थितीत मिळून आला म्हणून त्याला उठवायचा प्रयत्न केला असता त्याची काहीच हालचाल दिसुन आली नाही म्हणून त्याला उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय दोडामार्ग येथे दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. घटनास्थळी पोलीस सहाय्यक उपनिरीक्षक भगत,
पोलीस केरकर, पोलीस नाईक यांनी भेट दिली अधिक अधिक तपास सावंत करत आहेत.

शेअर करा